काँग्रेसच्या (Congress) महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल रौत्यांनी रात्री १२ वाजता नवीन नियुक्त्यांची यादी जाहीर केली, त्यानंतर मात्र भारतीय युवक काँग्रेसच्या दिल्लीतील मुख्यालयाने सकाळीच या नियुक्त्या रद्द केल्या. त्यामुळे युवक काँग्रेसमध्ये गटबाजी सुरु असल्याचे दिसत आहे.
या नियुक्त्या कोणत्याही अधिकृत मंजुरीशिवाय केल्या गेल्याने त्या अवैध ठरविण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच ज्यांनी कोणी या नियुक्त्या केल्या त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यालयाच्या पत्रात म्हटले आहे. प्रदेश शाखेने २० प्रदेश उपाध्यक्ष, ८ कार्याध्यक्ष आणि अन्य अनेक नियुक्त्या केल्या होत्या. या घटनेनंतर प्रदेश युवक काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांमध्ये आता कोणामागे रहायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे विद्यमान प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत आणि अखिल भारतीय युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यातील मतभेद यातून उघड झाले.
केंद्रीय समितीच्या नियमांप्रमाणे प्रदेशाध्यक्षांसह कोणालाही कसलीही नियुक्ती करायची असेल तर त्यासाठी केंद्रीय समितीची मान्यता लागते. राऊत यांनी अशी कोणताही मान्यता घेतली नव्हती. त्यामुळे केंद्रीय समितीने तातडीने दिल्लीहून पत्रक प्रसिद्ध करून फक्त ८ तासांमध्ये या सर्व नियुक्त्या रद्द करून टाकल्या. केंद्रीय समितीमध्ये राष्ट्रीय सचिव असलेल्या अजय चिंकारा, एहसान खान, कुमार रोहित यांच्या या पत्रकावर स्वाक्षऱ्या आहेत. (Congress)