‘छातीवर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले’, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असे म्हणत पाटलांच्या विधानावर स्पष्टीकरण देत सावरलं. पण, ठीक ढंग से बोले गए झूठ को ही आज कल सत्य कहते है, असे म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
(हेही वाचा – Indian Railway Concession: रेल्वे प्रवास होणार स्वस्त आणि सुखकर! रेल्वे मंत्रालयाने म्हटले….)
या सर्व घडामोडींनंतर संजय राऊत यांनी ट्विट करत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये पाटलांच्या वक्तव्यावर फडणवीस स्पष्टीकरण देताना दिसताय. या व्हिडिओला राऊतांनी कॅप्शन देखील दिले आहे.
असे आहे राऊतांचं ट्विट
Ohhh… loud speaker! ठीक ढंग से बोले गए झूठ को ही आज कल सत्य कहते है… जय महाराष्ट्र!
Ohhh… loud speaker!
ठीक ढंग से बोले गए
झूठ को ही आज कल
सत्य कहते है…
जय महाराष्ट्र!@AUThackeray@BJP4Maharashtra pic.twitter.com/NGLRSwBro8— Sanjay Raut (@rautsanjay61) July 24, 2022
गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात अनेक अनपेक्षित घटना घडत आहेत. यादरम्यान, राज्यातील अस्थिरतेमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर भाजप-शिवसेनेचं सरकार सत्तेत आलं. सध्या दोन मंत्र्याचेच मंत्रिमंडळ आहे. अशातच आम्ही मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे, असे खळबळजनक विधान चंद्रकांत पाटील यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चाणा उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.
Join Our WhatsApp Community