-
खास प्रतिनिधि
महायुतीच्या फडणवीस सरकारने (Fadnavis government) मंत्रिमंडळ विस्ताराला थोडा उशीर केला असला तरी एका दमात ४३ पैकी ४२ मंत्रीपदे भरून केवळ एक रिक्त ठेवले आहे. त्यामुळे अपवाद वगळता, पुढील किमान तीन-चार वर्षे तरी मंत्रिमंडळात फेरबदल होतील, याची शक्यता मावळली आहे.
१५ टक्क्यांची मर्यादा
राज्यातील एकूण आमदार संख्येच्या १५ टक्के इतकी मंत्र्यांची संख्या भरण्याची मुभा कायद्यात आहे. त्यामुळे २८८ च्या विधानसभेत मंत्रिमंडळात ४३ मंत्र्यांची पदे भरण्यास कमाल मर्यादा आहे. विधानसभा निकाल लागल्यानंतर १३ दिवसांनी, ५ डिसेंबर २०२४, या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी, एकनाथ शिंदे-अजित पवार, शपथ घेतली. तर रविवारी १५ डिसेंबर २०२४ या दिवशी ३९ मंत्र्यांना नागपूर येथील राज भवनच्या प्रांगणात शपथ देण्यात आली.
(हेही वाचा – पुण्याचा Ring Road प्रकल्प का रखडला? अजून किती भू संपादन करणे गरजेचे?)
हेतूपूरस्सर की योगायोग?
यामुळे आता मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांची संख्या ४२ वर गेली असून एक जागा रिक्त आहे. ही एक जागा हेतूपूरस्सर रिक्त ठेवली की योगायोगाने गणित जुळून आले, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. कदाचित ऐनवेळी कुणाची वर्णी लावायची झाल्यास एक जागा उपलब्ध असावी, म्हणून ही जागा भरण्यात आली नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
कुणाचे किती मंत्री?
या ४२ च्या मंत्रिमंडळात भाजपाचे (BJP) १६ कॅबिनेट तर ३ राज्यमंत्री असून त्याखालोखाल शिवसेनेचे (Shiv Sena)(शिंदे) नऊ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ८ कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community