छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj ) यांच्या जयंतीला ३९५ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने आग्रा येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj ) भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते की, आग्रा शहरात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना नजरकैदेत ठेवले होते. ती वास्तू महाराष्ट्र शासनामार्फत (Government of Maharashtra) अधिगृहीत करून तेथे भव्य स्मारक उभारण्यात येईल. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद अर्थसंकल्पात (Budget) करण्यात येईल. या आश्वासनाची पूर्तता करणारा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या स्मारकासाठी कार्यवाही आणि निधीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे देण्यात आली असून, यासंदर्भातील शासन निर्णय दि.२१ मार्च रोजी निर्गमित झाला आहे.
( हेही वाचा : मुंबईत देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी लवकरच धावणार; मंत्री Nitesh Rane यांचा विश्वास)
आग्रा (Agra) येथील ज्या ऐतिहासिक वास्तूत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) नजरकैदेत होते, ती वास्तू महाराष्ट्र शासन अधिग्रहीत करणार असून, त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त स्मारक उभारले जाणार आहे. संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम, माहितीपट आदी उपक्रमांच्या माध्यमातून महाराजांचा जाज्वल्य इतिहास पुढील पिढ्यांसाठी साकारला जाणार आहे. पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहासतज्ज्ञ आणि जाणकारांची समिती स्थापन होणार असून, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे. या ऐतिहासिक स्मारकामुळे देश-विदेशातील पर्यटकांना महाराजांच्या अद्वितीय पराक्रमाची गौरवगाथा अनुभवता येणार आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj)
राज्य सरकाचा शासन निर्णय असा
1) महाराष्ट्र शासन स्वनिधीतून आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज ज्या ठिकाणी नजरकैदेत होते, ती जागा/वास्तू अधिग्रहित करेल.
2) शासनाकडून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक निर्माण करण्यात येईल, या शौर्य स्मारकामध्ये महाराजांचा जाज्वल्य इतिहासाचा योग्य तो परिणाम साधण्यासाठी विभागामार्फत आवश्यक ते उपक्रम (संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम, माहितीपट इ.इ……) राबविण्यात येईल.
3) या प्रकल्पाकरीता जमीन अधिग्रहण आणि इतर तद्नुषंगिक बाबीकरीता पर्यटन विभाग “नोडल विभाग” म्हणून कार्यवाही करेल त्याअतंर्गत “महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ” हे “कार्यान्वयीन यंत्रणा” म्हणून कार्यरत राहतील.
4) पर्यटन विभाग या प्रकल्पाकरीता आवश्यक त्या निधीची तरतूद करेल.
5) आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक निर्माण करण्याकरीता व इतर बाबीकरिता मा.मंत्री (पर्यटन) यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ञांची / जाणकारांची वेगळयाने समिती निर्माण करण्यात येईल.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community