Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस केवळ आमचे राजकीय शत्रू ; संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण

214
Sanjay Raut Home Reiki : संजय राऊतांचा नुसताच कांगावा; निवासस्थानी रेकी करण्यासाठी नव्हे तर जिओ नेटवर्क टेस्ट ड्राईव्हसाठी आलेले

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी आमची वैयक्तिक दुश्मनी नाही. ते केवळ आमचे राजकीय शत्रू आहेत. महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आहे. आम्ही कोणाशीही व्यक्तिगत वैर करत नाही. उद्धव ठाकरे यांचं फडणवीसांना उद्देशून असलेलं, ‘एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन’, हे वक्तव्य केवळ राजकारणापुरतं मर्यादित होतं, असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

(हेही वाचा-Pune News: पुण्यातील चितळे बंधू दुकानावर चोरट्यांकडून दरोडा; व्हिडीओ व्हायरल)

मी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मी कधीही चहासुद्धा प्यायला नाही. मी एक कडवट शिवसैनिक आहे, असे सांगत राऊत (Sanjay Raut) यांनी फडणवीस यांच्याशी पडद्यामागून चर्चा सुरु असल्याची शक्यता फेटाळून लावली.

(हेही वाचा-Nana Patole यांच्या ‘त्या’ विनंती पत्रामुळे ठाकरे- पवार नाराज, मविआत पुन्हा वादाची ठिणगी)

दरम्यान माहीम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या सदा सरवणकर यांनी माघार घेतली तर ठाकरे गट आपला उमेदवार मागे घेणार का, असा प्रश्न राऊत यांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, माहीममध्ये आमचा उमेदवार मागे घ्यायला तिकडे पंडित नेहरु उभे आहेत का? इंदिरा गांधी किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उभे आहेत? ज्यांच्यासाठी उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घ्यावा. तरुण मुलांना राजकारणात लढू द्या. त्यांना राजकारण घासून पुसून कळू द्या. त्यांना समजू द्या राजकारणात काय त्रास आहे तो. तरंच त्यांचं नेतृत्व उभं राहील. आम्ही काय राजकारणात सहजपणे इथपर्यंत आलो आहोत का? असंही राऊत म्हणाले. (Sanjay Raut)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.