-
मुंबई प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून, जागा वाटपावरून महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार बैठका सुरू आहेत. पुण्यात काँग्रेस (Congress) पक्ष दहा जागा लढवण्यास इच्छुक आहे.आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. प्रत्येक पक्ष हा आपल्या पारड्यात कशा अधिकच्या जागा मिळतील यासाठी प्रयत्नशील असल्यास दिसून येतंय. पुण्यात काँग्रेस पक्षाला आता विधानसभेच्या दहा जागा मिळाव्यात अशी मागणी केली गेली आहे. पुणे शहरात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. पुणे शहरातील शिवाजीनगर कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेंट या तीन मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आहेत. (Mahavikas Aghadi)
(हेही वाचा- Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या अंतर्गत नाट्याचा पहिला अंक सुरू; विदर्भातील जागा वाटपावरून नाराजी नाट्य सुरू)
सक्षम उमेदवार, पक्षाच्या ताकती वर वाढीव जागा मिळाव्या
पुणे जिल्ह्यातील भोर पुरंदर या दोन जागा काँग्रेस पक्षाकडे आहेत. आता काँग्रेस (Congress) पक्षाने विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील तसेच पुणे शहरात दोन जागा वाढवून मिळावे असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे धरला. पुणे शहरातील पर्वती हडपसर तसेच पुणे जिल्ह्यातील खेड जुन्नर आणि दौंड या ठिकाणी पक्षाकडे सक्षम उमेदवार आहेत आणि या मतदारसंघात पक्षाची ताकद ही जास्त आहे त्यामुळे या जागा काँग्रेस पक्षाला मिळावे अशी मागणी पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते. (Mahavikas Aghadi)
गेल्या महिन्यात महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala), तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे पुणे दौऱ्यावर आले होते त्यावेळी पुण्यातील शहर काँग्रेसच्या वतीने विधानसभा निवडणुकीत पक्षाला जागा वाढवून मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. आता काँग्रेस (Congress) पक्षाने पुणे शहर व पुणे जिल्ह्यातील जागा वाढवून मागितल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Mahavikas Aghadi)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community