इंडी आघाडीतील सर्व छोटे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचार मांडत आहेत. त्यानुसार नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होणे पक्के झाले आहे. जेव्हा ही नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल तेव्हा मला सर्वात जास्त आठवण बाळासाहेब ठाकरे यांची येईल; कारण तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते, जेव्हा शिवसेनेची काँग्रेस होते, असे मला वाटेल तेव्हा मी शिवसेना बंद करेन. नकली शिवसेनेने बाळासाहेबांचे स्वप्न नष्ट केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
(हेही वाचा Narendra Modi: जिरेटोप प्रकरणाबाबत प्रफुल पटेल यांनी सोशल मीडियावर दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…)
नकली शिवसेनेला अहंकारामुळे…
नाशिक येथील प्रचारसभेला पंतप्रधान मोदी संबोधित करत होते. बाळासाहेब यांचे स्वप्न होते, जम्मू काश्मीरमधून ३७० संपवावे, हे स्वप्न पूर्ण झाले, पण यातून सर्वात जास्त चीड या नकली शिवसेनेला होत आहे. काँग्रेसने श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण नाकारले, नकली शिवसेनेनेही हाच मार्ग स्वीकारला. काँग्रेसने राम मंदिराला विरोध केला, नकली शिवसेना गप्प राहिली. हे नकली शिवसेनेचे पाप आहे, जे लोकांसमोर आले आहे. जी काँग्रेस वीर सावरकर यांना दिवस-रात्र सावरकर यांना शिव्या देते, त्या काँग्रेसला नकली शिवसेना डोक्यावर घेत आहे. याचा महाराष्ट्रातील जनतेला संताप आहे, पण नकली शिवसेनेला अहंकारामुळे हे दिसत नाही. काँग्रेससमोर गुडघे टेकवणाऱ्या शिवसेनाला धडा शिकवण्याचा निर्णय महाराष्ट्र जनतेने ठरवले आहे. ४ टप्प्यात मतदान झाले, त्यातच नकली शिवसेनेला चारही बाजूने चीत केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
काँग्रेसची अवस्था अशी आहे की त्यांना विरोधी पक्षातही बसता येणार नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातले एक नेते आहेत, त्यांनी असा दावा केला आहे की निवडणूक संपल्यावर काँग्रेस पक्षात लहान पक्ष विलीन होतील. तसा सल्लाच या बड्या नेत्याने दिला आहे. कारण त्यांना वाटतं की सगळी दुकानं सुरु आहेत ती एकत्र आली तर काँग्रेस विरोधी पक्षात बसू शकतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
Join Our WhatsApp Community