प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आसावरी जोशींनी राष्ट्रवादीत केला प्रवेश!

89

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री आसावरी जोशी यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पक्षप्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी आसावरी जोशी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणूक लढवणार अशी शक्यता होती. पण, वर्षभर काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर त्यांनी आता राष्ट्रवादीची वाट निवडली आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीत आसावरी जोशी यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

कलाकारांचे प्रश्न सोडवणार

“कलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी काम करेन. माझ्यावर जो विश्वास टाकण्यात आला आहे, तो मी नक्की पूर्ण करेन. मी एकच ठरवून आले आहे की, राजकारणात आले असले तरी राजकारण न करता काम करेन,” असे वक्तव्य आसावरी यांनी यावेळी केले.

( हेही वाचा: ‘काका मला वाचवा अशा आर्त हाका दिल्लीत ऐकू आल्या’, मनसेचा पवारांना खोचक टोला! )

कोण आहेत आसावरी जोशी?

सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील स्वाभिमान शोध अस्तित्त्वाचा या मालिकेत भूमिका साकारत आहेत. आसावरी जोशी यांचा जन्म 6 मे 1965 साली मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. लहानपाणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. रंगभूमीवर प्रायोगिक नाटकांमध्ये काम करत त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. पुढे त्यांचे काम पाहून त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.