अयोध्येत श्रीराम मंदिरात श्रीरामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठासाठी देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. या कार्यक्रमाच्या आधी देशभरात सर्वत्र सजावट सुरु होती. त्यानुसार पनवेल रेल्वेस्थानकातही हिंदू धर्मीय भगवे झेंडे लावत होते, तेव्हा धर्मांध मुसलमानांनी (Muslim) हिंदूंना मोठ्या प्रमाणात विरोध केला. त्याचा व्हिडिओ २१ जानेवारी या दिवशी सर्वत्र प्रसारित झाला. या वेळी धर्मांध मुसलमान ‘अल्ला हू अकबर’ (अल्ला महान आहे) आणि ‘नारा ए तकबीर’च्या (‘अल्लापेक्षा मोठे कुणी नाही’च्या) घोषणाही मोठमोठ्याने अन् त्वेषाने देत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
(हेही वाचा Shri Ramlala pranpratishtha : अयोध्येतील श्रीरामलला प्राणप्रतिष्ठानिमित्ताने सोशल मीडियात काय आहेत भावना?)
त्या वेळी तेथे उपस्थित असलेले पोलीस मात्र शिटी वाजवणे आणि त्यांच्याकडील काठीने जमावाला पांगवणे यापलीकडे काहीही करत नव्हते. या वेळी तेथे साधारण ७-८ पोलीस उपस्थित असल्याचे दिसते. या वेळी एका हिंदूला धर्मांधाने (Muslim) विनाकारण टपली मारल्याचा आणि एकाचा शर्ट ओढल्याचेही दिसून येत आहे. यानंतर हिंदु धर्मीय पराग बालड यांच्यासह माजी नगरसेवक मुकीद काझी आणि पनवेल येथील जामा मशिदीशी संबंधित एक अशा तिघांनी मिळून एक व्हिडिओ प्रसारित केला. त्यात म्हटले आहे, ‘वरीलप्रकारे प्रसारित होणारा व्हिडिओ म्हणजे एक अफवा आहे. आम्ही पिढ्यान्पिढ्या एकत्र रहात आहोत. असा कोणताही प्रकार घडलेला नाही. जे चालू आहे, ते खोटे आहे. रिक्शावाल्यांचे भाड्यावरून भांडण झाले होते, तो प्रकार या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.’
Join Our WhatsApp Community