Agriculture News : धनंजय मुंडे यांना शेतकऱ्याने घातली भावनिक साद; साहेब विम्याचे पैसे मिळाले….

यावर्षी राज्य शासनाने एका रुपयात पीक विमा देण्याची घोषणा करून त्याची यशस्वी अंमलबजावणी केली.

135
dhananjay munde
dhananjay munde

राज्यांतील दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी पीक विम्याची मदत नाही मिळवून दिली, तर मी सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही, अशी प्रतिज्ञा करणाऱ्या कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना शुक्रवारी (१० नोव्हेंबर) शेतकऱ्याने “साहेब पीक विम्याचे पैसे मिळाले आहेत, आता तुम्ही दिवाळी साजरी करा” अशी भावनिक साद घातली विशेष म्हणजे दिवाळीची भेटवस्तू देत भावनिक पत्रसुद्धा दिले. (Agriculture News)

यावर्षी राज्य शासनाने एका रुपयात पीक विमा देण्याची घोषणा करून त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. मात्र पावसाने २१ दिवसापेक्षा जास्त खंड दिल्यामुळे या पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी पात्र ठरले. मात्र अनेक पिक विमा कंपन्यांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करत विम्याबाबत चालढकल, अपील केले. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिल्याशिवाय मी सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही, अशी प्रतिज्ञा कृषीमंत्री मुंडे यांनी केली होती. (Agriculture News)

दरम्यान याबद्दल गोविंद देशमुख या प्रगतशील शेतकऱ्याने कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना एक भावनिक पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. या पत्रा सोबत त्यांनी दिवाळीची भेटवस्तू देऊन कृषीमंत्री मुंडे यांना आता आपणही दिवाळी साजरी करा अशी साद घातली. (Agriculture News)

(हेही वाचा – Chhand Dei Anand : ‘छंद देई आनंद’ कविता संग्रहास ‘बाल साहित्य अकादमी’ पुरस्कार प्रदान)

गोविंद देशमुख या शेतकऱ्यांने धनंजय मुंडेंना दिलेल्या पत्रातील मजकूर…

साहेब “यावर्षी कुठे अतिवृष्टी झाली तर कुठे दुष्काळामुळे शेतकरी होरपळला. परंतु राज्याच्या कृषीमंत्री पदावर आपण विराजमान असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला एक आशेचा किरण दिसला. ‘तुम्ही म्हणालात की, प्रधानमंत्री पीकवीमा योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत, तर मी सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही. तेव्हाच आम्हाला वाटले की, आमच्या घरातीलच कोणी कृषीमंत्री पदावर विराजमान आहे…! आपण शब्द पाळला, खरा करून दाखवला…! राज्यातील ३५ लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपये वितरीत झाले. आपले खुप खुप अभिनंदन..! आपल्या बीड जिल्ह्यात ७ लाख शेतकऱ्यांना २४१ कोटी रुपये मिळणार आहेत त्या बद्दलही आपले हार्दिक अभिनंदन….! आम्हाला खात्री आहे की, आपल्या पदाचा आपण असाच फायदा गोरगरीबांना मिळवून द्याल.” (Agriculture News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.