Lok Sabha Election च्या सहाव्या टप्प्यात शेतकरी नेते भाजपाच्या विरोधात सक्रीय; काय केले आवाहन?

209
Lok Sabha Election च्या सहाव्या टप्प्यात शेतकरी नेते भाजपाच्या विरोधात सक्रीय; काय केले आवाहन?
Lok Sabha Election च्या सहाव्या टप्प्यात शेतकरी नेते भाजपाच्या विरोधात सक्रीय; काय केले आवाहन?

लोकसभेची निवडणूक शेतकरी आंदोलकांच्या राज्यांत पोहचताच राकेश टिकैत (Rakesh Tikait) सक्रीय झाले आहेत. ही निवडणूक भाजपा (BJP) आणि विरोधक लढत नाही आहे तर भांडवलदार आणि जनता लढत आहे. यामुळे सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्याची क्षमता असले त्यांना मतदान करा असे आवाहन टिकैत यांनी केले  आहे. (Lok Sabha Election)

लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) पाच टप्पे पूर्ण झाले असून येत्या शनिवारी सहाव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. शनिवार दि. 25 मे रोजी देशातील 57 जागांसाठी मतदान होणार आहे. यात उत्तरप्रदेश 14, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये प्रत्येकी 8, ओडिशा 6, झारखंड 4, हरयाणा 10 आणि दिल्लीतील 7 मतदारसंघाचा समावेश आहे. (Lok Sabha Election)

(हेही वाचा- Pune Car Accident: पिझ्झा पार्टी, ब्लड रिपोर्टसंबंधी CP Amitesh Kumar यांची स्पष्टोक्ती)

सहावा आणि सातव्या टप्प्यात ज्या राज्यांमध्ये निवडणूक होणे आहे त्यात हरयाणा (Haryana), दिल्ली (Delhi) आणि पंजाब (Punjab) या राज्यांचा समावेश आहे. या तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या 31 जागा आहेत. यातील 17 जागांवर शनिवारी दि. 25 मे रोजी मतदान होणे आहे आणि सातव्या टप्प्यात 14 जागांवर मतदान होणे आहे. (Lok Sabha Election)

थोडक्यात, लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election) दिल्ली (Delhi) , हरयाणा (Haryana) आणि पंजाबमध्ये (Punjab) पोहचताच शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत सक्रीय झाले आहेत. या तीन राज्यांतील शेतक-यांनी एमएसपी  आणि अन्य मागण्यांसाठी दिल्ली बॉर्डरवर आंदोलन छेडले होते. (Lok Sabha Election)

(हेही वाचा- मुघलांच्या इतिहासाची भलावण करणाऱ्या Sharad Pawar यांना भगवद्गीता आणि मनाचे श्लोक डोळ्यांत खुपतायेत…)

आता दिल्ली, पंजाब, हरयाणातील शेतक-यांनी भाजपाच्या (BJP) उमेदवाराला हरविण्यासाठी मतदान करावे  असे आवाहन टिकैत यांनी केले आहे. (Lok Sabha Election)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.