किसान युनियन या तथाकथित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला आता गुन्हेगारीचे स्वरूप आले आहे. १७ जून २०२१ रोजी हरियाणा येथील कसार गावाच्या बाहेर एका व्यक्तीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला जीवंत जाळण्यात आले. या घटनेमुळे आता या परिसरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा थेट परिणाम येथील दैनंदिन जीवनमानावर पडला आहे. परिणामी आता स्थानिक नागरिक या आंदोलनाच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत.
या आंदोलनात ब्राम्हणांचा सहभाग नाही, म्हणून झज्जर जिल्ह्यातील कसार गावातील मुकेश शर्मा या व्यक्तीला जीवंत जाळण्यात आले. यामागे मुख्य आरोपी कृष्णा हा हरियाणा येथील राहणारा आहे आणि तो या आंदोलनात सहभागी आहे. आंदोलनातील नेत्यांनी मात्र ही आत्महत्याच आहे, असा दावा केला आहे.
आंदोलनात गुन्ह्यांची मालिका!
- १० डिसेंबर २०२१ – या दिवशी किसान युनियनच्या आंदोलनाच्या ठिकाणी खलिस्तानी समर्थकांनी घोषणाबाजी केली होती. त्यावेळी मात्र आंदोलनाच्या नेत्यांनी यापासून स्वतःला वेगळे केले होते.
Farmers Protest or Referendum 2020 ?
“Khalistan” is being painted in Delhi
This is #ShaheenBagh 2 under the banner of #FarmersProtest sponsored by separatist Khalistanis.
We must not forget that #NamoCares for the farmers of Bharat pic.twitter.com/M6x55lnM5t
— Ashish Jaggi (@AshishJaggi_1) November 28, 2020
Chanting #KhalistanZindabad and brandishing drawn swords, so-called ‘farmers’ praise #Bhindranwale as they head to Delhi to bring down the Indian flag on India’s #RepublicDay
80 police injured, one protestor dead. All smiles in Islamabad and Ottawa as pic.twitter.com/v00dOkFC0q
— Tarek Fatah (@TarekFatah) January 27, 2021
(हेही वाचा : आता पीएफआयचा देशविघातक चेहरा होतोय उघड!)
- २३ जानेवारी २०२१ – या दिवशी एका संशयित तरूणाला पकडले होते. तो शेतकरी नेत्यांची हत्या करणार होता, असा दावा स्वतः शेतकरी नेत्यांनी केला. त्याला माध्यमांसमोर उभा करण्यात आला. त्या दरम्यान त्याची चौकशी पोलिसांनी केली असता त्या तरुणाचे नाव योगेश असे समोर आले, तो सोनीपत येथे राहणार असून त्याने ‘किसान युनियन’च्या नेत्यांनीच त्यांची हत्या करण्यासंबंधी वक्तव्य करण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप त्या तरुणाने केला होता.
- २६ जानेवारी २०२१ – प्रजासत्ताकदिनी किसान युनियनने ट्रॅक्टर रॅली काढली होती. यामध्ये पोलिस आणि आंदोलनाच्या नेत्यांनी एक मार्ग निश्चित केला होता. मात्र त्याव्यतिरिक्त ही ट्रॅक्टर रॅली थेट लालकिल्ल्यावर वळवण्यात आली. प्रजासत्ताकदिनी ज्या मार्गावर परेड करण्यात आली, त्या ठिकाणी तोडफोड आणि सरकारी संपत्तीचे नुकसान करण्यात आले. पोलिसांना मारहाण करण्यात आली. तसेच लालकिल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकवण्यात आला. या दंगलीमध्ये ८६ पोलिस घायाळ झाले. त्यातील ४५ गंभीर जखमी झाले होते. यामध्ये कॅनडा आणि अमेरिका येथील खलिस्तानींचा म्होरक्या लक्खा सिधाना सारख्या गुन्हेगारांचे नियंत्रण होते.
JUST IN:-#Delhi–#Gazipur border. Police is using tear gas to stop farmers. #FarmersProtest #HistoricTractorMarch #26JanDelhiTractorParade pic.twitter.com/BoLWPGpuOc
— Wᵒˡᵛᵉʳᶤᶰᵉ Uᵖᵈᵃᵗᵉˢ𖤐 (@W0lverineupdate) January 26, 2021
- २३ फेब्रुवारी २०२१ – या दिवशी बहादुरगड येथील मुख्य बाजारातील एसके ज्वेलरी शॉपवर ३ तरुणांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. याविरोधात व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. दोन आरोपींना पोलिसांनी पकडले. हे आरोपी किसान युनियनच्या आंदोलनात सहभागी होते. ते आंदोलनस्थळीच मुक्कामी होते.
- २५ मार्च २०२१ – या दिवशी पंजाबमधील शेतकरी हाकम सिंह यांचा मृतदेह सेक्टर ९ मध्ये सापडले होते. ते बठिंडा येथे राहणारे होते. सिंग यांची भावजय कर्मजीत कौर आणि कुलवंत यांना उभा प्रकरणी अटक करण्यात आली. तेदेखील आंदोलनस्थळी राहत होते.
(हेही वाचा : पीएफआयच्या मिळकतीवर आयकर विभागाने काय केली कारवाई? वाचा…)
- ३ एप्रिल २०२१ – या दिवशी गुरप्रीत नावाच्या युवकाचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणात खुलासा झाला कि, रात्री सडे नऊच्या सुमारास गुरप्रीत आणि त्यांच्या गावाकडील रणबीर उर्फ सत्ता हे दारू पीत होते. त्यावेळी पैशावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी सत्ताने गुरप्रीतवर हल्ला केला. आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र गुरप्रीत याचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण उघड झाले.
- १२ एप्रिल २०२१ – या दिवशी पश्चिम बंगाल येथील युवती दिल्लीच्या सीमेवरील किसान युनियनच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आली होती. अनिल मलिक, अनुप चनौत, अंकुर सागवान यांनी तिच्यावर बलात्कार करून व्हिडिओ बनवला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली.
(हेही वाचा : पीएफआय आणि तिच्या विभिन्न संस्था आहेत तरी कुठे? वाचा… )
Join Our WhatsApp Community