मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या ‘त्या’ शेतकऱ्याचा अखेर मृत्यू!

सुभाष जाधव हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील रहिवासी आहेत. ते शुक्रवारी, २० ऑगस्टला सकाळी ११ वाजताच्या सुमारास मुंबईत मंत्रालय परिसरात आले होते.

68

फडणवीस सरकारच्या काळात धर्मा पाटील या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर विरोधकांनी रान उठवले होते. आता पुन्हा एकदा या घटनेची पुनरावृत्ती झाली असून, मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. यावरून आता राजकीय वातावरण तापले असून, माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली आहे. २० ऑगस्टला मंत्रालयासमोर विष प्राशन करून सुभाष जाधव या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या शेतकऱ्याचा आता उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

सुभाष जाधव यांच्यावर मुंबईतील जी.टी. रुग्णालयात उपचार सुरु होते. डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न केले. मात्र, त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील जीटी रुग्णलायात त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती त्यांचे पुत्र गणेश जाधव यांनी दिली. सुभाष जाधव हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील रहिवासी आहेत. ते शुक्रवारी, सकाळी ११ वाजताच्या सुमारास मुंबईत मंत्रालय परिसरात आले होते. यावेळी ते गार्डन गेटजवळ येऊन छोट्या बाटलीतील कीटनाशक प्यायले. त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. यावेळी ते तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना तातडीने जी.टी. रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला.

(हेही वाचा : बैलगाडा शर्यतीसाठी मंत्रालयात बैठक! बंदी उठवण्यासंबंधी ठरणार का भूमिका?)

म्हणून मंत्रालयासमोर विषप्राशन

सुभाष जाधव यांच्या जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाली होती. त्यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यातही धाव घेतली होती. पण तिथे योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ते अस्वस्थ होते. आपल्याला न्याय मिळावा यासाठी त्यांनी मंत्रालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते शुक्रवारी मुंबईत मंत्रालय परिसरात आले. तिथे त्यांनी मंत्रालयात जाण्याचा प्रवेश केला. पण त्यांना मंत्रालयात आत प्रवेश करण्यासाठी मज्जाव करण्यात आला. त्यामुळे त्यांनी मंत्रालयाच्या गेटसमोरच कीटनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

मंत्रालय आता सरंजामदारांचा किल्ला झाला आहे का?

दरम्यान यावरून आता विरोधक आक्रमक झाले असून, कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली. आपल्यावरील अन्यायाची दाद मागण्यासाठी मंत्रालयाच्या दारात आलेल्या सुभाष जाधव या शेतकऱ्याला पोलिसांनी आत न सोडल्यामुळे त्यांनी किटकनाशक प्रश्न करून प्राण सोडला. काळ्या पैशाची तहान भागवायला तुमची ठेकेदारी कधी धावून येणार का? मंत्रालय आता सरंजामदारांचा किल्ला झाला आहे का?, असा सवाल त्यांनी ट्विटवरून विचारला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.