देशभरात आता लोकसभेचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार आपापल्या पद्धतीने कामाला लागलेले आहेत. अशातच वेळेवर आघाडीतील जागावाटप न झाल्यास आघाडीत बिघाडी होऊ शकते आणि छोटे छोटे पक्ष आपले गट करून आघाडी बिघाडी करू शकतात असे स्पष्टपणे इंडी आघाडीचे (I.N.D.I. Alliance) प्रमुख नेते फारूख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी सुनावले आहे. (I.N.D.I. Alliance)
देशभरातील इंडी आघाडीमध्ये (I.N.D.I. Alliance) जागा वाटपावरून आतापासूनच धुसपुस होण्यास सुरुवात झाली आहे. इंडी आघाडी (I.N.D.I. Alliance) मधील घटक पक्ष असलेले प्रत्येक पक्ष आपली दावेदारी सांगत असताना अजूनही जागावाटप होत नसल्याने फारूक अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी माध्यमांसमोर आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. लोकसभेच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शीट शेअरिंग डिक्लेअर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याचे देखील बोलले जात आहे. परंतु आघाडीतील राजकीय पक्ष मात्र आता फार काळ वाट पाहू शकत नसल्याचे चित्र समोर येत आहे. यामुळेच एनडीए (NDA) घटक पक्षांच्या समोर उभी राहिलेली इंडी आघाडी (I.N.D.I. Alliance) जरी आता एक दिसत असली तरी आत मध्ये मात्र मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे चित्र आज फारूक अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांच्या बोलण्यातून स्पष्ट समोर येत आहेत. (I.N.D.I. Alliance)
…तर ही आपली सर्वात मोठी चूक
माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) म्हणाले की, पक्षांनी केवळ त्यांचे वर्चस्व असलेल्या जागांची मागणी करावी आणि जिथे ते प्रभावी नसतील अशा जागांची मागणी करणे चुकीचे आहे. ते म्हणाले की, लोकशाही धोक्यात आहेच, शिवाय येणाऱ्या पिढ्याही आपल्याला माफ करणार नाहीत. जर आपण आपला अहंकार बाजूला ठेवून या देशाला कसे वाचवायचे याचा एकत्रित विचार केला नाही, तर मला वाटते की ही आपली सर्वात मोठी चूक असेल.” (I.N.D.I. Alliance)
नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी म्हटले आहे की, जर जागावाटपाबाबत लवकरच करार झाला नाही तर भारत आघाडी धोक्यात येऊ शकते आणि काही सदस्य वेगळा गट स्थापन करण्याचा प्रयत्न करू शकतात. माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांना दिलेल्या मुलाखतीत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री अब्दुल्ला म्हणाले की, देश वाचवायचा असेल तर मतभेद विसरून देशाचा विचार करावा लागेल. (I.N.D.I. Alliance)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community