राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा जो काही राजकीय पातळीवर आरोप प्रत्यारोप झाले. त्यामुळे राज्यात सरकारची चांगलीच नाचक्की झाली. त्यावर राज्य सरकारने बरीच सारवासारव केली. मात्र मंत्रिमंडळाची बैठक होताच FDA च्या आयुक्त पदावरून अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. त्या जागी सेल्स टॅक्सचे विशेष आयुक्त पदी असलेले परिमल सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अभिमन्यू काळेंचा बळी?
सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची अत्यंत गरज भासते. मात्र दुर्दैवाने या इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढत आहे. अशा वातावरणात या इंजेक्शनचा पुरवठा करण्यात राज्य सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये अत्यंत नाराजीचा सूर होता. त्यातच भाजप नेते, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातमधील दमण येथील रेमडेसिवीरचे पुरवठादार ब्रुक फार्मा कंपनीशी चर्चा करून ५ हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी फडणवीस हे FDA चे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या संपर्कात होते. मात्र त्याचवेळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मात्र फडणवीस यांनी हा साठा लपवल्याचा आरोप केला, मात्र जेव्हा FDA आणि फडणवीस यांच्यातील समन्वयाची माहिती समोर यआली, तेव्हा राज्य सरकारने याचा बळी अभिमन्यू काळे यांचा दिला आहे का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात ऐकू येत आहे.
Join Our WhatsApp Community