भारतद्वेष बाळगणा-या कतारला जाब विचारण्याची वेळ…हिंदुत्ववादी संतापले

157

‘फिफा फुटबॉल विश्वचषका’चे आयोजन करणार्‍या कट्टर इस्लामी देश कतारमध्ये सर्व इस्लामी परंपरा पाळले जातात. कतारने यंदाच्या विश्वचषकाला धार्मिक रंग दिला आहे. विश्वचषक सुरु होण्यापूर्वी कतारमध्ये 500 हून अधिक नागरिकांचे इस्लाममध्ये धर्मांतर केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. भारताने आतंकवादी म्हणून घोषित केलेला डॉ. झाकीर नाईक याला सध्या कोणताही देश आश्रय देत नसतांना कतारने आश्रय दिला आहे. याच कतारने हिंदु देवदेवतांची विडंबना करणारा वादग्रस्त चित्रकार मकबूल फिदा हुसेन यालाही आश्रय दिला होता. तसेच कतारने नुपूर शर्मा प्रकरणात भारताला खडसावले होते. भारताने उपस्थित केलेल्या प्रश्नावर ‘डॉ. झाकीर नाईकला आम्ही बोलावले नाही’, असे ‘राजकीय उत्तर’ कतारने दिले आहे. डॉ. झाकीर नाईकला आश्रय देणार्‍या कतारचा भारतविरोधी इतिहास पाहता कतारला कसे प्रत्युत्तर द्यावे, हे भारताने ठरवण्याची वेळ आता आली आहे, असे स्पष्ट प्रतिपादन इतिहास व संस्कृती अभ्यासक आणि लेखक अधिवक्ता सतीश देशपांडे यांनी केले.

झाकीर नाईक विरोधात रेड काॅर्नर नोटीस काढा

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘फिफा फुटबॉल विश्वचषकामध्ये जिहादी डॉ. झाकीर नाईक का आमंत्रित?’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होेते. सुदर्शन न्यूजचे ‘चॅनेल हेड’ मुकेश कुमार म्हणाले की, डॉ. झाकीर नाईकला कट्टर इस्लामी देश कतारने फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या आयोजन कार्यक्रमात बोलावले. ‘फुटबॉल हा खेळ इस्लामनुसार ‘हराम’ आहे !’ हे 4 वर्षांपूर्वी डॉ. झाकीर नाईक याने म्हटले होते; तसेच त्याने त्या वेळी फुटबॉल खेळणे, पाहणे यालाही मनाई केली होती. झाकीर नाईकने त्या वेळी मलेशियात आसरा घेतला असल्याने 2017 पासून भारत सरकार त्याला आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. झाकीर नाईक विरोधात 2019 ला चार्टशीट दाखल झाली असून त्याच्या विरोधात ‘रेड कॉर्नर नोटिस’ दाखल व्हावी, यासाठी भारत प्रयत्न करत आहे. आता झाकीर नाईकने मलेशियातून कतार येथे स्थानांतर केल्यावर कतारने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, तरी तो फार काळ वाचवू शकणार नाही.

(हेही वाचा The kashmir Files : IFFI 2022 चे ज्युरी नदव लॅपिड यांना इस्राईलनेही सुनावले )

कतारचा निषेध

हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते सतीश कोचरेकर म्हणाले की, झाकीर नाईकने अत्यंत हीन स्तरावर हिंदु देवदेवतांवर टीका करत अपमान केला आहे. हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदु संघटनांच्या विरोधामुळे झाकीर नाईकला भारताबाहेर पलायन करावे लागले. ‘इसिस’सारख्या आतंकवादी संघटनांतील अनेक अतिरेक्यांनी झाकीरच्या भाषणांमुळे प्रेरणा मिळाली, हे उघडपणे कबूल केले आहे. या आंतरराष्ट्रीय आतंकवाद्याला फिफा फुटबॉल विश्वचषकात बोलावणार्‍या कतारचा आम्ही भारतीय नागरिकांच्या वतीने धिक्कार करतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.