जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेत अर्जेंटिनाने फ्रान्सवर मात करत जेतेपद पटकावले. अर्जेंटिनाने 36 वर्षांनी फिफा विश्वचषक 2022 वर आपले नाव कोरले. अर्जेंटिनाच्या विजयाचा भारताच्या अनेक भागात जल्लोष साजरा करण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मेस्सीवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत होता.
संपूर्ण जगात मेस्सीचे चाहते आहेत. भारतातही मेस्सीचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे फायनल जिंकल्यावर भारतीय चाहत्यांनी मेस्सीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. पण याचदरम्यान, आसाममधील एका काॅंग्रेस खासदाराने मेस्सीसंदर्भात केलेले वक्तव्य भलतेच चर्चेत आले आहे. मेस्सीचे भारत कनेक्शन असल्याचे खासदार म्हणाले. मात्र, मेस्सीचा भारताशी संबंध जोडण्याचे काॅंग्रेसच्या खासदाराला महागात पडले आहे. सोशल मीडियावर नेटक-यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केले आहे.
( हेही वाचा: शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची आता महापालिकेतील पक्ष कार्यालयात रोज हजेरी )
काय आहे काॅंग्रेस खासदाराचे ट्वीट?
आसाम काॅंग्रेसचे खासदार अब्दुल खालिक यांनी ट्वीटरवर मेस्सीचे अभिनंदन केले आणि लिहिले की, तुमचे मनापासून अभिनंदन, आम्हाला तुमच्या आसाम कनेक्शनचा अभिमान आहे. खालिक यांनी मेस्सीच्या आसाम कनेक्शनबाबत उल्लेख केल्यानंतर एका युजनरने नेमके मेस्सी आणि आसामचे कनेक्शन काय? अशी विचारणा केली. त्यावेळी अर्जेंटिनाचा फुटबाॅलपटू लियोनेल मेस्सीचा जन्म भारताच्या आसाममध्ये झाल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या या ट्वीटनंतर खालिक यांना मोठ्या प्रमाणावर यूजर्स ट्रोल करत आहेत. ट्रोल होत असल्याचे पाहून खासदार खालिक यांनी ट्वीट डिलिट केले.
Join Our WhatsApp Community