FIFA 2022 : ‘फिफा’मध्ये धर्मांध मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर हुसेन, भारताच्या आक्षेपानंतर कतारचा खुलासा

93

यंदाचा फिफा फुटबॉल  विश्वचषक विविध कारणांमुळे चर्चेत आला आहे. यात विशेष चर्चा झाली ती धर्मांध मुस्लिम धर्मप्रसारक आणि भारताचा फरार आरोपी झाकीर नाईक यांची. रविवार, २० नोव्हेंबर २०२२ रोजी  कतारमध्ये सुरू झालेल्या फिफा फुटबॉल स्पर्धेच्या उदघाटनाच्या वेळी झाकीर नाईक कार्यक्रमस्थळी दिसला, त्यावेळी कतारने झाकीर नाईक याला आमंत्रित केल्याचे वृत्त आले आणि भारतात खळबळ उडाली. याप्रकरणी भारतात संताप व्यक्त होऊ लागला, परिणामी कतारने तात्काळ यावर स्पष्टीकरण देत अशा प्रकारे झाकीर नाईकला कतारने अधिकृत निमंत्रण दिले नव्हते, भारत-कतार द्विपक्षीय संबंध बिघडवण्यासाठी इतर देश जाणीवपूर्वक हे चुकीचे वृत्त पसरवत असल्याचे कतारने खुलासा केला आहे.

https://twitter.com/SaffronSwamy/status/1594208225473499137?s=20&t=UOPbvXAxuruISCLcTdZv0w

फिफा विश्वचषकाच्या उद्घाटन समारंभात झाकीर नाईकच्या सहभागाची माहिती मिळताच भारताने कतारकडे आपला निषेध नोंदवला. झाकीर नाईकला व्हीव्हीआयपी बॉक्समधून फुटबॉलचे सामने पाहण्यासाठी निमंत्रित केल्यास भारताला उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांचा दौरा रद्द करण्यास भाग पाडले जाईल, असे मोदी सरकारने कतारला स्पष्टपणे सांगितले होते. तरीही उपराष्ट्रपती धनखर यांनी उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली आणि दुसऱ्याच दिवशी ते भारतात परतले.

(हेही वाचा ठाकरे गटाच्या व्यासपीठावरून सुषमा अंधारेंनी म्हटले ‘बिस्मिल्ला ए रेहमान ए रहीम…’  )

कोण आहे झाकीर नाईक? 

भारत 2016 पासून झाकीर नाईकच्या शोधात आहे. फरार झाकीर नाईकवर मनी लाँड्रिंगचा तसेच तरुणांना दहशतवादासाठी प्रवृत्त करत असल्याचा आरोप आहे. झाकीर नाईकवर द्वेषपूर्ण भाषण दिल्याचाही आरोप आहे. यावर्षी मार्चमध्ये, फरार झाकीर नाईक संचालित इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (IRF) ला गृह मंत्रालयाने बेकायदेशीर संस्था म्हणून घोषित केले होते. UAPA च्या कठोर कलमांनुसार IRF वर बंदी घालण्यात आली आहे. झाकीर नाईकने मलेशियामध्ये आश्रय घेतला आहे. भारताने यासंदर्भात मलेशियाला प्रत्यार्पणाची विनंतीही पाठवली आहे. 2020 मध्ये दिल्लीत झालेल्या दंगलीतही त्याचा हात असल्याचे मानले जात आहे. द्वेषपूर्ण भाषणामुळे झाकीर नाईकवर ब्रिटन आणि कॅनडानेही बंदी घातली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.