हिंदुत्ववादी वैभव राऊत मराठा मोर्चात बॉम्बस्फोट करणार होता, असे वक्तव्य केल्याप्रकरणी Jitendra Awhad यांच्यावर गुन्हा दाखल करा; ठाणे न्यायालयाचा आदेश

अधिवक्ता खंडेलवाल यांनी भाईंदर पोलिस ठाण्यात जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १५३(अ) आणि ५०५(२) अंतर्गत दोन समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण केल्याबद्दल तक्रार दाखल केली.

208
राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) चे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या विरोधात हिंदू टास्क फोर्सचे संस्थापक अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी दाखल केलेली फौजदारी याचिका स्वीकारताना, ठाणे न्यायदंडाधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायमूर्तींनी ३ फेब्रुवारीला भाईंदर पोलिस ठाण्याला आदेश दिला की, जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम १५३अ आणि ५०५ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करण्याचे निर्देश दिले.
ऑगस्ट २०१८ मध्ये, मुंबई एटीएसने नालासोपारा येथून गोरक्षक वैभव राऊत यांना अटक केली होती, तिथून देशी बनावटीचे बॉम्ब जप्त केले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने एक व्हिडिओ बनवला आणि कोणताही पुरावा न देता गुन्हेगारी विधान केले. वैभव राऊत मराठा मोर्चात बॉम्ब फोडणार होता, असे वादग्रस्त विधान केले होते. विशेष म्हणजे एटीएसने तपासादरम्यान किंवा आरोपपत्रात कुठेही असा दावा केलेला नव्हता की वैभव राऊत मराठा मोर्चात बॉम्बस्फोट करणार होता.
यानंतर अधिवक्ता खंडेलवाल यांनी भाईंदर पोलिस ठाण्यात जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १५३(अ) आणि ५०५(२) अंतर्गत दोन समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण केल्याबद्दल तक्रार दाखल केली. परंतु खंडेलवाल यांच्या तक्रारीवर भाईंदर पोलिस ठाण्याने एफआयआर नोंदवला नाही. त्यानंतर खंडेलवाल यांनी ठाणे येथील न्यायदंडाधिकारी ५ व्या न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला. तत्कालीन न्यायदंडाधिकाऱ्यांनी १३ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या त्यांच्या आदेशानुसार निर्णय दिला की, आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलेले विधान प्रथमदर्शनी भारतीय दंड संहितेच्या कलम १५३(अ) आणि ५०५(२) अंतर्गत दखलपात्र गुन्हा आहे. परंतु अधिकारक्षेत्राच्या आधारावर, दंडाधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्यास नकार दिला होता. त्यानंतर खंडेलवाल यांनी १३ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका क्रमांक १ मध्ये अपील केले. त्याला क्रमांक ४४७६/२०२१ दाखल करून आव्हान देण्यात आले. त्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाने ६ सप्टेंबर २०२४ रोजीच्या आपल्या आदेशात अधिवक्ता खंडेलवाल यांची याचिका स्वीकारताना, न्यायदंडाधिकाऱ्यांचा आदेश बाजूला ठेवला आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याच्या अधिवक्ता खंडेलवाल यांच्या मागणीवर पुन्हा सुनावणी करण्याचे आदेश न्यायदंडाधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर, न्यायदंडाधिकारी ठाणे यांनी भाईंदर पोलीस ठाण्याला जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल आव्हाडांच्याविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.