पोलीस अधिकारी रश्मी शुक्लांविरुद्ध ‘या’ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल!

117

महाराष्ट्र विधीमंडळाच्या २०२१ च्या पावसाळी अधिवेशनामध्ये उपस्थित झालेल्या प्रश्नानुसार शासनाने सन २०१५ ते २०१९ या पाच वर्षीय कालावधीतील संपूर्ण फोन बेकायदेशीरपणे टेलिफोन टॅपिंग केल्याप्रकरणी न्यायालयात वाद सुरु असतानाच पुणे शहर बंडगार्डन पोलीस ठाण्यात माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध टेलिग्राफ अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच वर्षांच्या कालावधीत संपूर्ण फोन टॅपिंग प्रकरणाची पडताळणी

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त डॉ. रश्मी शुक्ला यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या त्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे कार्यरत आहेत. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत महाराष्ट्र विधीमंडळ 2021 च्या पावसाळी अधिवेशनामध्ये उपस्थित झालेल्या प्रश्नानुसार सरकारने 2015 ते 2019 या पाच वर्षांच्या कालावधीत संपूर्ण फोन टॅपिंग प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांच्यावर आणि इतर संबंधितांवर भारतीय तार अधिनियम कलम 26 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी शासनाची दिशाभूल करुन काही खासगी व्यक्तींचे फोन टॅप केले. त्यांची ही कृती भारतीय टेलिफोन अ‍ॅक्टचा गैरवापर करणारी आणि संबंधीत व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे, असा गंभीर ठपका चौकशी अहवालात ठेवला होता.

(हेही वाचा अखेर संभाजी छत्रपती बसले आमरण उपोषणाला, कारण…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.