आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मविआचे रवींद्र धंगेकर आणि रुपाली ठोंबरेंविरुद्ध गुन्हा दाखल

133

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा रुपाली ठोंबरे यांच्याविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तक्रारी करण्यात आल्या आहेत. या तक्रारीची दखल घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली आहे.

निवडणूक प्रचार संपल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप पैसे वाटप करीत असल्याचा आरोप करुन उपोषण केले होते. त्यातून आचारसंहिता भंग केल्याने त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे यांनी मतदान यंत्राचा फोटो व्हायरल करुन मतदान गोपनीयतेचा भंग केल्याने त्याबाबत तक्रार करण्यात आली आहे.

(हेही वाचा – भाजपच्या हेमंत रासनेंविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!)

याबाबत कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्रेहा विसवे यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यांची दखल घेऊन कारवाई करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.