राज्यात ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे 10 टक्के आरक्षण दिले आहे. मात्र काही विरोधक जातीयद्वेष परसरविण्याचे काम करीत असून त्यांच्या अफवांना बळी पडू नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रविवारी, 10 मार्च रोजी हिंगोली येथे केले. येथील रामलीला मैदानावर शासन आपल्या दारी कार्यक्रमात ते बोलत होते.
मी मुख्यमंत्री असलो तरी कॉमन मॅन आहे. सर्व सामान्यांच्या प्रश्नांची मला जाण असून हे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न आमचे डबल इंजिनचे सरकार करीत आहे. सरकार स्थापनेपूर्वीच्या सरकारकडून राज्याला काहीही मिळाले नाही. मात्र मागील दिड ते पावने दोन वर्षाच्या काळात शासनाच्या विविध योजना शासन आपल्या दारीच्या माध्यमातून थेट जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम सरकारने केले आहे. या योजनेमध्ये राज्यात 5.60 कोटी जनतेला विविध योजनांचा लाभ मिळाला असल्याचे त्यांनी (CM Eknath Shinde) सांगितले.
(हेही वाचा Mayawati : मायावती स्पष्टच म्हणाल्या, युती, आघाडी नकोच; स्वबळावर लढणार
म्हणून विरोधकांच्या पोटात दुखत
सरकारच्या कामाचा धडका पाहून विरोधकांच्या पोटात दुखत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. त्यांची पोटदुखी कमी करण्यासाठी आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केला आहे. सरकारच्या कामाच्या धडक्यापुढे विरोधकांच्या लवंगी फटाक्याचा आवाजही येत नाही. महायुतीचा फटाका अन धडाका मोठा असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवर टिका केली. जेव्हा संवाद साधण्याची वेळ होती तेव्हा जनतेला ठोकरले, दुर केले त्यांच्याशी संवाद साधला नाही आता संवाद साधण्यासाठी यात्रा काढत असल्याची टिका त्यांनी (CM Eknath Shinde) केली.
Join Our WhatsApp Community