डॉ. नीलम गोऱ्हे यांचा शिंदे – फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

291
अखेर डॉ. नीलम गोऱ्हे यांचा शिंदे - फडणवीस उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश

शिवसेनेच्या (उबाठा गट) नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का समजला जातोय.

एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड केल्यानंतर अनेक नेते शिवसेनेत दाखल झाले आहेत. मात्र त्या बंडानंतरचा हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण नीलम गोऱ्हे ह्या केवळ विधान परिषदेच्या आमदार नाहीत तर त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहे. महत्त्वाचं म्हणजे नीलम गोऱ्हे यांनी २२ फेब्रुवारी १९९८ रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता तेव्हापासून त्यांनी कायमच शिवसेनेची बाजू ठामपणे मांडली होती.

(हेही वाचा –  ठाकरे गटाला पुन्हा धक्का; विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे करणार शिवसेनेत प्रवेश)

शिंदेंचीच सेना अधिकृत – नीलम गोऱ्हे

“एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना योग्य मार्गाने जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाने स्पष्ट निकाल दिला आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाच अधिकृत आहे,” अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.