2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधी सर्व पक्षांनी I.N.D.I.A आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून सर्व छोट्या-मोठ्या पक्षांनी भाजपप्रणीत NDAने मोर्चे बांधणी सुरु केली आहे. आता कर्नाटकातील जनता दल सेक्युलर (जेडीएस) एनडीए मध्ये सहभागी झाला आहे. शुक्रवार, 22 सप्टेंबर रोजी हा निर्णय घेण्यात आला.
आगामी लोकसभा निवडणुकीआधी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपली आघाडी अधिक मजबूत करण्यावर भर दिला. भाजपविरोधात इंडिया (INDIA) आघाडी स्थापन झाल्यानंतर भाजपने (BJP) ही एनडीए (NDA) बळकट करण्यावर भर दिला आहे. तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकसोबत युती तुटली असली तरी कर्नाटकमध्ये भाजपला दिलासा मिळाला. देवेगौडा यांचा पक्ष भाजपच्या नेतृत्त्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी झाला आहे. एप्रिल महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी जनता दल सेक्युलर पक्षाला फॅमिली प्रायव्हेट पार्टी म्हटले होते.
माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलरने (जेडीएस) भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सामील होण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी, 22 सप्टेंबर रोजी जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनी गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी भाजप अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community