- सुजित महामुलकर
गेले अनेक दिवस रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला (Cabinet Expansion ) अखेर मुहूर्त मिळाला असून रविवारी १५ डिसेंबर २०२४ या दिवशी सायंकाळी ४ वाजता नागपूर येथील राज भवनमध्ये हा विस्तार होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असल्याचे समजते.मुख्यमंत्री शपथविधीपूर्वी एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी अखेरपर्यंत निर्णय घेतला नाही त्यामुळे भाजपाने मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा दिवस जाहीर केला होता. त्याप्रमाणे मंत्रिमंडळ विस्तारातही शिंदे यांच्या मंत्र्यांची यादी अद्याप निश्चित होत नव्हती, असे सांगण्यात आले.
( हेही वाचा : शाह व नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपाचे १२ जानेवारीला शिर्डीत प्रदेश अधिवेशन; Chandrashekhar Bawankule यांची माहिती)
अखेर शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची भेट घेतली आणि मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अंतिम केल्याचे कळते. यानुसार रविवारी १५ डिसेंबरला सायंकाळी ४ वाजता हा विस्तार नागपूरच्या राज भवनवर होईल.
राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे रविवारपासून मंगळवार १७ डिसेंबरपर्यंत नागपुरमध्ये असणार आहेत. १९ डिसेंबरचा त्यांचा नागपूरमधील कार्यक्रम रद्द झाला असून ते १५,१६ आणि १७ असे तीन दिवस नागपुरात आहेत, असे समजते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजयी मिरवणूक रविवारी सकाळी ११ वाजता निघणार असून साधारण ३ तास चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Cabinet Expansion )
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community