सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यावर खासदार संभाजी राजे यांच्यासह विविध मराठा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर आता राज्य सरकारने मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे, तशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरद्वारे दिली.
#मराठा_आरक्षण बाबत आम्ही शासनाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची प्रमुख मागणी मान्य करण्यात आली असून, आज सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 22, 2021
संभाजी राजे यांनी सुरु केले आंदोलन!
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यावर मराठा समाजामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली. संतप्त मराठा समाजाला अखेर खासदार संभाजी राजे यांनी एका छताखाली आणले आणि आरक्षणाच्या मुद्यासह मराठा समाजाच्या विकासासाठी ६ मागण्या केल्या. त्यासाठी संभाजी राजे यांनी आधी सर्व पक्षीय नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर कोल्हापूर आणि नाशिक येथे मूक आंदोलन केले. त्या दरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही चर्चा केली. नाशिकच्या आंदोलनाच्या वेळी संभाजी राजे यांनी सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या असून काही मागण्यांसाठी २१ दिवस मागितले आहे. मात्र आपण त्यांना १ महिन्याचा अवधीत देत आहोत, असे संभाजी राजे म्हणाले होते. मंगळवारी, २२ जून रोजी संभाजी राजे यांनी ट्विट करून राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल केली असल्याची माहिती दिली.
(हेही वाचा : संभाजी राजे जमिनीवर, भुजबळ खुर्चीवर! मूक आंदोलनात काही काळ तणाव! )
सरकारला १ महिन्यांचा दिला अल्टिमेटम!
मराठा आरक्षणाबाबत आम्ही शासनाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची प्रमुख मागणी मान्य करण्यात आली असून, आज सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली, असे ट्विट करुन संभाजी राजे यांनी राज्य सरकारने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेची माहिती दिली आहे. संभाजी राजे यांनी कोल्ह्यपूर त्यानंतर नाशिक येथे मराठा मूक आंदोलनाचे आयोजन केले होते. कोल्हापुरातील मूक आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांकडून संभाजीराजे यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले. त्यावेळी झालेल्या बैठकीत सरकार मराठा समाजाच्या सहा मागण्यांवर सकारात्मक असल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली होती. त्यात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या मागणीचा समावेश होता.
Join Our WhatsApp Community