अखेर माजी गृहमंत्री देशमुख यांचीही सीबीआय करणार चौकशी!

सीबीआय अधिकाऱ्यांनी रविवारी, 11 एप्रिल रोजी सचिन वाझे याचे दोन चालक, अनिल देशमुख यांचे खासगी सचिव एस कुंदन आणि संजीव पालांडे यांनाही बोलावले होते. या सगळ्यांची 8 ते 10 तास चौकशी करण्यात आली.

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत ६ जणांचे जबाब नोंदवून घेतले असून त्यात परमबीर सिंग, याचिककर्त्या वकील जयश्री पाटील, एसीपी संजय पाटील, सचिन वाझे आणि माजी गृहमंत्री यांचे स्वीय सहायक कुंदन शिंदे आणि पालांडे यांचा समावेश आहे. सोमवारी, १२ मार्च रोजी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. १४ मार्च रोजी देशमुख याना सीबीआयसमोर हजार राहावे लागणार आहे.

देशमुखांच्या खासगी सचिवांचीही केली चौकशी!

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांची हायकोर्टाने सीबीआयला 15 दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सीबीआय अधिकाऱ्यांनी रविवारी, 11 एप्रिल रोजी सचिन वाझे याचे दोन चालक, अनिल देशमुख यांचे खासगी सचिव एस कुंदन आणि संजीव पालांडे यांनाही बोलावले होते. या सगळ्यांची 8 ते 10 तास चौकशी करण्यात आली. याआधी अँटिलिया स्फोटक प्रकरणी एनआयएच्या ताब्यात असलेले सचिन वाझे, महेश शेट्टी बार मालकासह मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, तक्रारदार अॅडव्होकेट जयश्री पाटील यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. आता माजी गृहमंत्री देशमुख यांची चौकशी करण्यात येणार आहे.

(हेही वाचा : वाझेचा सहकारी काझी पोलिस खात्यातून निलंबित!)

काय आहे हे प्रकरण?  

काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दर महिन्याला 100 कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. याप्रकरणाच्या चौकशीची सुरुवात सीबीआयने याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या जबाबाने केली. त्यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख असलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांचीही चौकशी करण्यात आली होती. सीबीआयने सचिन वाझेच्या केबिनमधून मिळालेली डायरीही आपल्या ताब्यात घेतली आहे. या डायरीत त्यांच्या सर्व वसुलीच्या रेटकार्डचा उल्लेख आहे. तसेच कोणासोबत किती रुपयांचा व्यवहार झाला ही बाबही नमूद करण्यात आले असल्याचे सूत्रांकडून समजते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here