Finance Ministry : फक्त अर्थ मंत्रालयात 11 लाख पदे रिक्त

106
Finance Ministry : फक्त अर्थ मंत्रालयात 11 लाख पदे रिक्त
Finance Ministry : फक्त अर्थ मंत्रालयात 11 लाख पदे रिक्त

देशात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असतानाच एकट्या अर्थ मंत्रालयात 11 लाखापेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. यात अर्थ मंत्रालयाच्या (Finance Ministry) अखत्यारित येणारे विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा समोवश आहे.

अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उत्तर देताना सांगितले की, अर्थ मंत्रालय (Finance Ministry) आणि मंत्रालयाच्या अखत्यारित येणा—या विभागात एकूण 11 लाख तीन हजार 989 पदे रिक्त आहेत. तामिळनाडूहून द्रमुकचे खासदार डी एम कथीर आनंद यांनी केवळ अर्थ मंत्रालयात किती जागा रिक्त असल्याचा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या उत्तरात सितारामन यांनी ही माहिती दिली.

(हेही वाचा – BMC : उपनगरांतील रस्ते कामांच्या कंत्राटांना मंजुरी, शहर भागातील कंत्राट वाटाघाटीतच अडकले)

सध्या देशात सर्वाधिक चर्चेत असलेले अंमलबजावणी संचालनालय (ईडी), सिरिसर फ्रॉड इनव्हेस्टिगेशन आर्गनायजेशन (एसएफआयओ), फायनांशियल इनवेस्टिगेशन युनिट (एफआययू), सीबीडीटी, सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बॅंका, अग्रिकल्चर इंशुरन्स कंपनी आफ इंडिया, जीआयसी, आयडीबीआय, सिडबी, एलआयसी, न्यू इंडिया, नॅशनल, युनायटेड, ओरियंटल या इंशुरन्स क्षेत्रातील चारही कंपन्यासह अन्य कंपन्या अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारित येतात. यासर्व विभागांमधील पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. हे विशेष.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.