मुंबईतील माजी आमदार कृष्णा हेगडे यांच्यासह अनेकांची फसवणूक केल्या प्रकरणी गोरेगाव पूर्व येथे राहणाऱ्या एका जोडप्याविरुद्ध आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश शेट्टी यांनी तक्रार नोंदवली आहे. आशिष मेहता आणि शिवानी मेहता असे या जोडप्याचे नाव आहे. या जोडप्याविरुद्ध ड्रग्स तस्करीचे गुन्हे दाखल असून हे जोडपे भारताबाहेर पळून गेले असून दोघा विरुद्ध लूक आउट नोटीस जारी करण्यात आली आहे.
शेट्टी म्हणाले की, त्यांनी स्पेशल पोलीस कमिशनर देवेन भारती यांना ह्या जोडप्यांबद्दल माहिती दिली व त्यांच्या मदतीने शिवांगी आणि आशिष मेहता यांचे १६० कोटी रुपये असणारे बोगस बँक अकाउंट बंद केले. २६ जून रोजी त्यांच्यावर एफआयआर दाखल केला. या जोडप्याविरुद्ध मध्य प्रदेशमध्ये देखील एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अटक होण्याच्या भीतीने दोघांनीही भारताबाहेर पळ काढला आहे.
पळून गेलेल्या दाम्पत्यांची ब्लिस्स कॉन्सुलटन्टस ही कंपनी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)च्या नोंदणीकृत पोर्टफोलिओतील व्यवस्थापन सेवा (PMS) किंवा अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड (AIF) या कंपनी पैकी एक नाही. त्यामुळे ही कंपनी बंद करण्यात यावी आणि या जोडप्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी उमेश शेट्टी करत आहेत.
(हेही वाचा Ajmer Kand : चित्रपट प्रदर्शित करू दिला नाही, तर ‘यु-ट्यूब’वर करू ! – दिग्दर्शक सचिन कदम)
Join Our WhatsApp Community