
-
प्रतिनिधी
कराड येथील शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, चौकशी अहवाल प्राप्त होताच नियमाप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.
सदस्य महेश शिंदे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले की, या प्रकरणात सहाय्यक प्राध्यापक डॉ. फहिम जहांगीर सय्यद यांना २५ लाख रुपये घरबांधणीसाठी अग्रिम मंजूर करण्यात आले होते. मात्र, सेवेत असताना डॉ. सय्यद यांचे निधन झाले. त्यानंतर शासन नियमाप्रमाणे ८ लाख ४९ हजार २३ रुपये इतकी व्याजाची रक्कम क्षमापित करण्यात आली, तर ९ लाख ६ हजार २५० रुपये शिल्लक मुद्दल त्यांच्या मृत्यू नंतर सेवा उत्पादनातून वसूल करण्यात आली.
(हेही वाचा – Narco Terrorism देशासाठी धोकादायक; तरुण पिढीचे रक्षण करण्याची गरज; समीर वानखेडे यांनी केले प्रबोधन)
मात्र, या प्रकरणात महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य यांनी डॉ. सय्यद यांच्या वारसांकडून १७ लाख ५५ हजार २७३ रुपयांची रक्कम धनादेशाद्वारे मागितली, जे पूर्णतः नियमबाह्य होते. त्यामुळे डॉ. सय्यद यांच्या वारसांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महाविद्यालय प्रशासनाने ही रक्कम वारसांना परत करणे आवश्यक आहे.
या प्रकरणाची चौकशी तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, पुणे यांच्यामार्फत करण्यात येत असून, संपूर्ण चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे मंत्री पाटील (Chandrakant Patil) यांनी स्पष्ट केले. तसेच, महाविद्यालयाच्या ताब्यात असलेल्या जागेबाबत निर्माण झालेल्या वादावरही आपण स्वतः लक्ष ठेवून हा विषय मार्गी लावू, असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला आश्वस्त केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community