शिवसेना पक्षाचे माजी खासदार राहुल शेवाळे यांची मानहानी केल्याप्रकरणी उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने २ हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच मानहानीच्या दाव्यातून आरोपमुक्त करण्यासाठी ठाकरे आणि राऊत यांनी न्यायालयात अर्ज केला तोदेखील न्यायालयाने फेटाळला. (Fine on Thackeray)
‘सामना’ या मुखपत्राच्या मराठी आणि हिंदी दैनिकात शेवाळे यांची बदनामी करणारा लेख छापल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. तसेच ‘सामना’वर कारवाई केली जावी, अशी विनंतीदेखील शेवाळे यांच्याकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी काही महिन्यापूर्वी ठाकरे आणि खासदार राऊतांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. (Fine on Thackeray)
(हेही वाचा – माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका करणे Jitendra Awhad यांना भोवले)
२९ डिसेंबर २०२२ या दिवशी हा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता, असा दावा शेवाळे यांनी केला. या प्रकरणात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मानहानीच्या दाव्यातून दोषमुक्त करावे असा अर्ज न्यायालयात दाखल केला होता. मात्र तो फेटाळण्यात आला. (Fine on Thackeray)
न्यायालयाने दोन हजार रुपये दंड ठोठावून तो दहा दिवसांत जमा करण्याचे आदेश ठाकरे आणि राऊत यांना दिले आहे. मानहानीच्या खटल्यातील विलंब माफ करण्यासाठी एक हजार रुपये अतिरिक्त दंड ठोठावताना एकत्रित दोन हजार रुपये असा दंड दोन आठवड्यात जमा करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने दिले आहेत. (Fine on Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community