भाजप कार्यकर्त्यांविषयी ‘तो’ अपशब्द वापरणं राऊतांना पडलं भारी, दिल्लीत गुन्हा दाखल

129

भाजप कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरणं शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांना चांगलंच महागात पडलं आहे. संजय राऊत यांनी अपशब्द वापरल्याने त्यांच्याविरोधात राजधानी दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दीप्ती रावतयांनी तक्रार दाखल केली असून राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणीही दीप्ती रावत यांनी केली आहे.

(हेही वाचा –मोदींच्या हस्ते आज वाराणसीत काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन!)

ही XXगिरी बंद करा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना खुर्ची देण्यावरुन विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना “प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही. ही XXगिरी बंद करा” असे संजय राऊत म्हणाले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. शरद पवार यांना संजय राऊत खुर्ची देतानाचा हा फोटो होता. या फोटोवर भाजपाच्या काही नेत्यांनी राऊतांना चांगलंच टार्गेट केलं. यांवर राऊत यांनी आक्रमक होऊन असे म्हटले की, पितृतुल्य नेत्याला खुर्ची देण्यात वावगं ते काय? पवारांच्या जागी वाजपेयी किंवा अडवाणी जरी असते, तरी मी त्यांना खुर्ची दिली असती, असं सांगतानाच सगळ्याच गोष्टीत राजकारण आणू नका. XXगिरी बंद करा.

काय म्हणाले नेमकं राऊत…

शरद पवारच काय, तिथे लालकृष्ण अडवाणी असते तरी मी त्यांना खुर्ची दिली असती. पवारांचं वय, त्यांना होणारा त्रास या सर्व गोष्टी आहेत. पवारांना वयोमानामुळे पायाचा त्रास आहे. अशावेळी पितृतुल्य व्यक्तीला खुर्ची दिली तर काय बिघडलं? हे जर कुणाला आवडलं नसेल तर ती विकृती आहे. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादवही आले असते आणि त्यांना असा त्रास असता, तर त्यांनाही मी स्वत: खुर्ची दिली असती. राजकारणात मतभेद असतील, तरी हे सर्व लोक सार्वजनिक जीवनातील पितृतुल्य आहेत, असे म्हणत राऊत यांनी टीकास्त्र सोडली.

राऊतांच्या विधानावर भाजपाचा आक्षेप

संजय राऊत यांच्या विधानावर भाजपने आक्षेप घेतला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात होती. त्याच वेळी संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्वीट करून Xतिया या शब्दाचा अर्थ सांगितला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.