शारीरिक उंची वाढल्यामुळे बौद्धिक उंची वाढते असे नाही. हे नाना पटोले यांनी दाखवून दिले आहे. काँग्रेस नेत्यांच्या मनात मोदींजींबद्दल असूया आहे हे दिसते. पंजाबमध्ये पंतप्रधानांचा ताफा अडवणे, त्यानंतर नाना पटोले यांचे विधान, अशा प्रकारचे विचार लोकशाहीला घातक आहेत. मला एका घटनेचे आश्चर्य वाटते, पण मी समर्थन करीत नाही की, आमच्या एका कार्यकर्त्याने मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला राबडी देवी म्हटलं, तर मध्यरात्री त्याच्या घरी पोलिस जातात आणि नाना पटोले मी पंतप्रधानांना मारू शकतो, अशी थेट धमकी देतात तरीही त्यांच्याविरुद्ध साधा एफआयआरही दाखल होत नाही. आता कायदा माणूस बघून चालेल, अशी परिस्थिती आली आहे, असे स्पष्ट करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे.
( हेही वाचा : भुजबळांच्या निषेधार्थ घरापुढे काळी रांगोळी! नेमकं काय आहे प्रकरण )
राज्यात सिलेक्टिव्ह काम सुरू
त्यांच्या गावात मोदी नावाची एकही व्यक्ती नाही. त्यामुळे ते कोणाबद्दल बोलले हे स्पष्ट झाले आहे. आता ते घाबरलेत. चारही बाजूनं टीका सुरू झाल्याने ते पळ काढत आहेत. पण कितीही पळ काढला तरी त्यांच्या मनातले विष त्यांच्या ओठावर आले. नाना पटोले यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये? एखादा माणूस मी मारू शकतो असं म्हणत असेल तर तो गुन्हाच आहे! आणि तो दाखल झाला पाहिजे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबतीत जे विधान केले त्यापेक्षा हे भयानक विधान आहे. केंद्रीय मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना रातोरात अटक करणारे पोलिस आता का गप्प आहेत? कारवाई का करीत नाहीत?, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. म्हणून मी म्हणतो सिलेक्टिव्ह काम सुरू आहे. पोलिस विभाग सिलेक्टिव्ह होतो त्या राज्याची अधोगती झाल्याशिवाय राहात नाही, असा इशाराही फडणवीसांनी दिला आहे.
( हेही वाचा : राणीबागेत जन्मली मुंबईकर वाघीण! ‘वीरा’ तिचे नाव… )
मुख्यमंत्र्यांचे ते कर्तव्यच आहे, उपकार नाहीत
मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारीच आहे की देशाच्या पंतप्रधानांना कोणी जीवे मारण्याची धमकी देत असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे ! मुख्यमंत्र्यांचे ते कर्तव्यच आहे, उपकार नाहीत. पिंपरी चिंचवडमधल्या घटनेबाबत हक्कभंग आणण्याची काही गरज नाही. त्यांच्या पक्षातल्या अनेक नेत्यांनी आनंद व्यक्त केला पाहिजे, की मोदींनी दिलेल्या मेट्रोला पवारांनी पसंतीची पावती दिली आहे. असे सांगत फडणवीसांनी शरद पवारांना विनंती केली आहे की. मुंबईतील मेट्रो ३ जी मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंमुळे रखडलेली आणि अडकलेली आहे, त्याचे उदघाटन करून त्याची कार शेड तात्काळ आरे मध्ये करावी. ती मेट्रोही लोकांना मिळेल, अशी व्यवस्था करावी कारण ते तसं करू शकतात, असेही ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community