भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर कर्ज बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंबोज यांच्या कंपनीने 2011 ते 2015 या कालावधीत इंडियन ओव्हरसिज बॅंकेकडून 52 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, पण कर्ज ज्या कारणासाठी घेतले होते, ते त्यासाठी न वापरता ती रक्कम इतर ठिकाणी वापरण्यात आल्याचा आरोप कंबोज यांच्यावर करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
( हेही वाचा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण; शस्त्रक्रिया पुढे ढकलली )
Satyameva Jayate pic.twitter.com/OZJWCpWZVV
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) May 31, 2022
कंबोज यांनी सर्व आरोप फेटाळून लावले
मोहित कंबोज म्हणाले की, माझ्या विरोधात मुंबई पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. एक जुनी कंपनी जी 2017 ला बंद झाली आहे. त्याचे बॅंक इश्यू काढून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. महाविकास आघाडी सरकार असे वागून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पण तसे होणार नाही. हे नवाब मलिक वा संजय राऊत यांचे काम असेल तर मी यांच्याविरोधात कायदेशीर लढा देईन. आम्ही याला घाबरणार नाही, असे म्हणत कंबोज यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
Join Our WhatsApp Community