शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे दहिसरमधील माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांच्या विरोधात शिलाई मशीनप्रकरणी महापालिकेची फसवणूक तसेच अपहार केल्याप्रकरणी पोलिसांमध्ये महापालिकेने गुन्हा दाखल केला आहे. नगरसेवक नसतानाही १५ सप्टेंबर २०२२ रोजी ब्रीद यांनी ४७ शिवण यंत्राचे वाटप केले असून यासाठी महापालिकेच्या समाजविकास अधिकाऱ्यांची मान्यताही घेतली नाही. ब्रीद यांनी दबाव आणून ५७ शिवण यंत्रांचे वाटप होऊ दिले नव्हते, अशा प्रकारची तक्रारच या पोलिस एफआयआरमध्ये नोंदवण्यात आली आहे. मात्र, ज्या शिवण यंत्राचे वाटप केले ते महापालिकेच्या मान्यतेनुसार आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थित केले असल्याने हा अपहार किंवा फसवणुकीचा गुन्हा कसा होतो असा सवाल करत माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी हे आरोप खोडून याविरोधात आपण न्यायालयात योग्य ती बाजू मांडू असे सांगितले.
शिवण यंत्राच्या वाटपात अपहार
दहिसरमधील प्रभाग क्रमांक तीनचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांच्यावर सहाय्यक अभियंता यांनी शिलाई मशीन वाटपात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची कारकीर्द ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली असून त्यानंतर प्रशासनाकडून मुंबई महानगरपालिकेचा कारभार चालविला जात आहे. असे असतानाही माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी दहिसर केतकी पाडा येथील प्रभाग क्रमांक तीनमध्ये जे २०४ शिवण यंत्राच्या वाटपात अपहार केला केल्याची तक्रार केली आहे. त्यातील ४७ शिवण यंत्रांचे वाटप १५ सप्टेंबर २०२२ रोजी माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रिद यांनी केले. त्यासाठी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची महानगरपालिका समाज विकास अधिकारी यांच्याकडून कोणती मान्यता घेतली नाही तसेच त्यांना कळवले नाही. उलट नगरसेवक पदी नसतानाही अधिकाऱ्यांवर दबाव टाकून त्यांनी गैर मार्गाने अपहार करून या शिवण यंत्राचे वाटप केले अशी तक्रार सहाय्यक अभियंता सुशील बबनराव इंगोले यांनी पोलिसांमध्ये केली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून संबंधित महानगरपालिका कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे यात माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रिज यांनी कर्मचारी अधिकाऱ्यांवर दबाव आणून जबरदस्तीने हा अपहार केल्याचे समोर येत असल्याचे सहाय्यक अभियंता यांचे म्हणणे आहे.
(हेही वाचा आधी बदली, नंतर स्थगिती…; चोवीस तासांच्या आत तीन पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांना स्थगिती)
दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
तसेच अजूनही ५७ शिवण यंत्र हे बाळकृष्ण ब्रिज यांनी दबाव आणून त्याचे वाटप होऊ दिले नाही याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना दिलेली नाही. या अनुषंगाने माजी नगरसेवक ब्रीद यांच्यावर दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक पदी नसताना नियोजन विभागाच्या कामात ढवळाढवळ करणे, हस्तक्षेप करणे त्यांच्या दबावामुळेच शिवण यंत्र वाटपात दिरंगाई झाल्याचे म्हटले आहे. आर दक्षिण विभागातील समाज विकास अधिकाऱ्यांच्या ताब्यातील ४७ शिवण यंत्र माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रिद यांनी प्रभाग क्रमांक तीन दहिसर पूर्व मुंबई येथे नगरसेवक पदी नसतानाही वाटप करून महानगरपालिकेची फसवणूक व अपहार केला असून त्यांच्या विरोधात म मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
१०० शिलाई मशीनचे वाटप केले होते
बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी याबाबत बोलतांना महापालिकेने ज्या बऱ्याच वस्तू वाटायला दिल्या होत्या,त्या शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी वाटल्या नाही. उलट या वस्तू वाटल्याची खोटी कागदपत्रे सादर केली होती. त्यामुळे या मशीनचे वाटप न करता तशाच ठेवून महापालिकेची फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी दोन माजी नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे म्हात्रे यांनी म्हटले आहे. तर माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी ही तक्रार राजकीय सूड भावनेतून केली जात असल्याचे सांगत या शिलाई मशिन महापालिकेच्या ताब्यात होत्या आणि त्याचे वाटप महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच मी केले आहे. यापूर्वी २९ एप्रिल २०२२ रोजी आमच्यासोबत असलेले आणि बाळासाहेबांची शिवसेना गटात सामील झालेले आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत १०० शिलाई मशीनचे वाटप केले होते. तेव्हाही मी माजी नगरसेवकच होतो. त्यामुळे याप्रकरणी मी चौकशी यंत्रणेला योग्य ते सहकार्य करेन आणि मी निर्दोष आहे हे सिध्द करेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community