दिल्लीतील महाराष्ट्र सदनात भीषण आग

राजधानी दिल्लीत असलेल्या महाराष्ट्र सदनाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दिल्लीतील कस्तुरबा मार्गावर असलेल्या महाराष्ट्र सदनाला सोमवारी सकाळी आग लागल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांसाठी राखीव असलेल्या कक्षाला ही आग लागल्याचे समजते. ही आग लागण्यामागचे नेमके कारण अजून कळले नसून, आग आटोक्यात आणण्यात यश आले असल्याची माहिती मिळत आहे.

शॉर्ट सर्किटमुळे आग

दिल्लीत असणा-या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्राच्या राज्यपालांसाठी राखीव असणा-या कक्षाला, सोमवारी सकाळी अचानक भीषण आग लागली. सुदैवाने त्याठिकाणी कोणीही उपस्थित नसल्याने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. मात्र, राज्यपाल कक्षाचे नेमके किती नुकसान झाले आहे, याची अजून माहिती मिळालेली नाही. तसेच ही आग लागण्याचे कारणही अजून अस्पष्ट आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते. तूर्तास तरी ही आग आटोक्यात आणण्यात यंत्रणांना यश आले आहे.

राजधानी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावर महाराष्ट्र सदन आहे. या सदनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यासाठी राखीव कक्ष आहेत. जेव्हा राज्यातील नेते, मुख्यमंत्री आणि राज्यपाल काही कारणांसाठी दिल्लीत जातात, त्यांच्यासाठी हे महाराष्ट्र सदन उभारण्यात आले आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here