नाशिक जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू कक्षात शॉर्ट सर्किटमुळे आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. छोट्या बाळांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. कक्षात 66 नवजात बालक होते, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यात येत आहे.
(हेही वाचा Waqf Amendment Bill 2025 : वक्फ सुधारणा विधेयकामुळे ‘हे’ १० प्रमुख बदल होणार)
शॉर्ट सर्किट झाल्यानंतर त्वरित सर्व बालकांना दुसऱ्या कक्षात हलवण्यात आले. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. शॉर्ट सर्किट झाल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व परिचरिकांनी लगेच बालकांना सुरक्षित दुसऱ्या कक्षात हलवले. शॉर्ट सर्किटने आग (Fire) लागल्याने मातांची धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले. 66 नवाजत शिशूंना शेजारच्या वॉर्डमध्ये नेण्यात आले आहे. शॉर्ट सर्किट कशामुळे घडले याचे कारण समोर आले नाही. नाशिक जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या कक्षात ठेवत त्या बाळांवर उपचार करण्यात येत आहे. या ठिकाणी नातेवाईकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Join Our WhatsApp Community