अमेरिकेत राजकीय हिंसाचार वाढत असल्याच्या काही घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. यानंतर आता अमेरिकेतील ॲरिझोना येथे डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस (Kamala Harris) यांच्या प्रचार कार्यालयात गोळीबार झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
(हेही वाचा-Tirupati Laddu: तिरुपती लाडूच्या वादानंतर आता जगन्नाथ पुरी मंदिराने घेतला मोठा निर्णय!)
पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला असून मध्यरात्रीनंतर अज्ञातांनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ज्यावेळी कार्यालयात गोळीबार झाला, त्यावेळी त्या ठिकाणी कोणीही नव्हतं. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, यानंतर आता कमला हॅरिस यांच्या प्रचार कार्यालयात काम करणाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या घटनेनंतर तपास यंत्रणा घटनास्थळी जाऊन घटनेचा तपास करत आहेत. (Kamala Harris)
(हेही वाचा-Vishrambaug Wada : काय आहे विश्रामबाग वाड्याचा इतिहास?)
गोळीबार घडल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. कार्यालयाच्या खिडक्यांमधून गोळ्या झाडल्या गेल्या. दरम्यान, या कार्यालयात अशी घटना दुसऱ्यांदा घडली असल्याचंही सांगितलं जात आहे. पोलिसांनी सांगितले की, समोरच्या खिडक्यांवर पेलेट गनने गोळीबार करण्यात आला. या घटनांनंतर अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु केला आहे. (Kamala Harris)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community