नाशिक : भरदिवसा भाजप शहराध्यक्षावर गोळीबार; सर्वत्र खळबळ

134

देशात सध्या एका मागोमाग एक हत्या, गोळीबार किंवा एन्काउंटरच्या घटना घडतांना दिसत आहे. समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढतांना दिसत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार नाशिक येथे भरदिवसा भाजप पक्षाच्या शहराध्यक्षावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला. अंबड पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या बाजीप्रभू चौकात हा हल्ला करण्यात आला. घटनेत भाजप पदाधिकारी राकेश कोष्टी जखमी झाले आहेत. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

(हेही वाचा –कुख्यात गँगस्टर अतिक अहमद हत्या : पोलिसांचे निलंबन, प्रयागराजमध्ये इंटरनेट सेवा बंद)

गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी पुढील कारवाईला सुरुवात करून एका संशयिताला अटक केली आहे. मागच्या एका महिन्यात नाशिकमध्ये दोनदा गोळीबाराची घटना घडली आहे. त्यामुळे आता तेथील सुरक्षितेवर प्रश्न निर्माण होत आहेत.

पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबार करणारा हा सराईत गुन्हेगार आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे जया दिवे असे असून पोलिसांकडून पुढील कारवाई सुरु असल्याचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.