धक्कादायक! पुण्यातील मनसेच्या नेत्यावर गोळीबार

122

पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. शनिवारी, २१ जानेवारीला रात्री राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील त्यांच्या राहत्या घरासमोर हा धक्कादायक प्रकार घडला. पण सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नक्की काय घडले? 

हा धक्कादायक प्रकार मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यासोबत घडला. मी खेडचा भाई आहे. एकाला घालवलाय. तुलाही माज आलाय, संपवतोच तुला म्हणत बंदूक रोखून समीर थिगळे यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यानंतर या गुंडांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारामुळे परिसरात खळबळ माजली होती. माहितीनुसार, खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या आरोपींकडून थिगळे यांच्याकडे खंडणीची मागणी करत हा गोळीबार झाला.

आरोपीने समीर थिगळे यांच्यावर बंदूक रोखत गोळीबार केला. मात्र, नशीब बलवत्तर होत म्हणून छातीवर गोळीबार न झाल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी राजगुरुनगर पोलिसांनी मिलिंद जगदाळे आणि मयुर जगदाळे यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला करत शस्त्राचा वापर करुन पैसे मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

(हेही वाचा – ‘आजवर उद्धव ठाकरेंनी कोणत्याही नेत्याला मोठे होऊ दिले नाही, संजय कदमांची ही राजकीय आत्महत्या’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.