अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी लेडी जिल बायडेन (First Lady Jill Biden) हे दोघेही दोन दिवसांनी भारतात होणाऱ्या जी २० परिषदेत सहभागी होणार होते. मात्र त्याआधीच दोघांचा कोरोना रिपोर्ट आला आहे आहे. त्यानुसार फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर जो बायडेन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आता राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या भारत दौऱ्याबाबत प्रश्न निर्माण झाले आहे. व्हाईट हाऊसने याबाबतचं अधिकृत वृत्त दिलं आहे.
(हेही वाचा – Ganeshotsav 2023: गणपतीची मूर्ती शाडू माती की पीओपीची, मूर्तिकारांनी शोधून काढली आगळीवेगळी संकल्पना)
सध्या अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन (First Lady Jill Biden) यांना डेलावेअर येथील रेहोबोथ बीच येथील त्यांच्या घरी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्या जो बायडेन यांच्यासोबत दोन दिवसांनंतर दिल्ली येथे होणाऱ्या जी 20 शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी येणार होत्या. ७१ वर्षीय (First Lady Jill Biden) जिल बायडेन १६ ऑगस्टला साऊथ कॅरोलिना या ठिकाणी सुट्टीसाठी गेल्या होत्या. तेव्हा त्यांच्यासह राष्ट्रपती जो बायडेनही होते. तिथे त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता आणि जिल बायडेन या पाच दिवस क्वारंटाईन राहिल्या होत्या. आता पुन्हा एकदा त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
अमेरिकेत (First Lady Jill Biden) गेल्या आठवड्यात कोरोना बाधितांमध्ये तसेच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. अशातच अमेरिकेत कोरोनाचा नवा व्हेरियन्ट आढळून आला आहे. पिरोला किंवा BA.2.86 चे वाढते रुग्ण अमेरिकेसाठी चिंतेची बाब आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, या नव्या विषाणूमुळे संक्रमण वाढण्याचा धोका आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community