Shivsena UBT-NCP (SP) ची पहिली यादी ‘सामना’तून प्रसिद्ध होणार?

266
Shivsena UBT-NCP (SP) ची पहिली यादी ‘सामना’तून प्रसिद्ध होणार?
Shivsena UBT-NCP (SP) ची पहिली यादी ‘सामना’तून प्रसिद्ध होणार?

शिवसेना उबाठा (UBT) आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरद पवार) (NCP) यांच्यात आज सोमवारी २५ मार्चला जागावाटपावर चर्चा आणि काही जागांवरील उमेदवार निश्चित करण्यात आले. यातील १५-१८ उमेदवारांची यादी शिवसेना उबाठाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून प्रसिद्ध करण्याचे या बैठकीत ठरल्याचे समजते. (Shivsena UBT-NCP (SP))

(हेही वाचा- खलिस्तानींनी AAP ला दिले 133 कोटी; केजरीवाल यांनी दहशतवादी भुल्लरची सुटका करण्याचे दिलेले आश्वासन; दहशतवादी Gurpatwant Singh Pannu चा आरोप)

कॉँग्रेसमध्ये स्वस्थता

कॉँग्रेस (Congress) आणि उबाठा (UBT) यांच्यात अद्याप काही जागांवर एकमत झालेले नाही. त्यामुळे ती चर्चा पुढे सुरू राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात प्रामुख्याने सांगली मतदार संघाचा असून उबाठाने परस्पर चंद्रहास पाटील यांना उमेदवार म्हणून जाहीर केल्याने कॉँग्रेस पक्षात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. (Shivsena UBT-NCP (SP))

(हेही वाचा- दारू घोटाळ्यादरम्यान मुख्यमंत्री Arvind Kejriwal यांनी वापरलेला मोबाईल फोन गायब)

वाद नसलेल्या जागांची घोषणा

आज सोमवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ((NCP)) शरद पवार (Sharad Pawar ), जयंत पाटील यांच्यासह अन्य काही नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानी चर्चेसाठी गेले. सुमारे दीड तास झालेल्या चर्चेत वाद नसलेल्या काही जागांवरील अंतिम झालेल्या उमेदवारांची घोषणा दैनिक सामनातून करण्याचे ठरले, असे समजते. या बैठकीला कॉँग्रेस नेते नसल्याने उलट-सुलट चर्चा होत आहे. (Shivsena UBT-NCP (SP))

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.