‘जलवाहतुकीस प्रोत्साहन आणि पर्यटनास चालना देण्यासाठी फ्लोटिंग जेट्टी व इतर सुविधा निर्माण करणार’

145
'जलवाहतुकीस प्रोत्साहन आणि पर्यटनास चालना देण्यासाठी फ्लोटिंग जेट्टी व इतर सुविधा निर्माण करणार'
'जलवाहतुकीस प्रोत्साहन आणि पर्यटनास चालना देण्यासाठी फ्लोटिंग जेट्टी व इतर सुविधा निर्माण करणार'

जलवाहतुकीस प्रोत्साहन आणि पर्यटनास अधिक चालना देण्यासाठी मुंबईतील ‘एनसीपीए’ परिसरातील समुद्र किनारी फ्लोटिंग जेट्टी, फ्लोटेल वेटींग एरिया प्लॅटफॉर्म व इतर अनुषंगिक सुविधा निर्माण करण्यात येतील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मेघदूत निवासस्थान येथे फ्लोटेल प्रकल्पाबाबत बैठक झाली. यावेळी आमदार मदन येरावार, बंदरे विकास विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.

(हेही वाचा – भाजपची भाकरी फिरवण्यास सुरुवात; मुनगंटीवार, महाजन, तावडे यांना लोकसभेत पाठविण्याची भाजपची तयारी)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात जलवाहतुकीस प्रोत्साहन देण्यात येत असून मुंबईतील ‘एनसीपीए’ परिसरातील समुद्र किनारी फ्लोटिंग जेट्टी, पार्किंग लाॅन्स, प्रतिक्षालये व इतर अनुषंगिक सुविधा निर्माण करण्यात येतील. याद्वारे पर्यटन विकासालाही अधिक चालना मिळेल. यांसारख्या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. सर्व संबंधित विभागांनी यासंदर्भात समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.