मुख्यमंत्र्यांच्या अधिवेशनातील उपस्थितीसाठी ‘खास’ रस्ता, संदीप देशपांडे म्हणाले…

103

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवार, २२ डिसेंबरपासून सुरुवात झाली. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपस्थित राहता यावे, म्हणून मुंबई महापालिकेने रातोरात वर्षा बंगला ते विधान भवनपर्यंतचा रस्ता खड्डे विरहीत केला, त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मिश्किल टीका केली.

(हेही वाचा ‘या’ कारणासाठी मुख्यमंत्र्यांनी चहापानाला मारलेली दांडी)

काय म्हणाले संदीप देशपांडे?

राज्यातील अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये मुख्यमंत्री ठाकरे उपस्थितीत राहतील, अशी चर्चा सुरु होती, मात्र मुख्यमंत्री आलेच नाहीत. त्यावेळी उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत, हे स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असे ठासून सांगितले. प्रत्यक्षात अधिवेशन सुरु झाले तरी मुख्यमंत्री आलेच नाही. त्यावेळी मुख्यमंत्री ज्या रस्त्यावरून वाहनाने येणार, त्या रस्त्यावर बरेच खड्डे आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्रास होईल, म्हणून महापालिकेने रातोरात रस्त्यावरील खड्डे भरून काढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनसे येते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली. त्यांनी ट्विट करत, ‘मुख्यमंत्री विधानसभेत जाणार असल्यामुळे वर्षा ते विधान भवन हा रस्ता खड्डे विरहित करण्यात आला. असेच मुख्यमंत्री जर राज्यभर फिरले, तर काय मज्जा येईल ना?pl, pl, pl राज्यभर दौरे कराल का?’, असे म्हटले.

‘हिंदुस्थान पोस्ट’ने सर्वात आधी दिलेले वृत्त

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नाही, त्यांना जर अधिवेशनात उपस्थित राहायचे असेल, तर त्यासाठी त्यांना शारीरिक त्रास होऊ नये. याकरता महापालिकेने वर्षा बंगला ते विधान भवन या दरम्यान रस्ता खड्डेमुक्त केला, हे काम महापालिकेने रातोरात केले. त्यासाठी राज्य सरकारने महापालिकेला कामाला लावले. या पार्श्वभूमीवर ‘हिंदुस्थान पोस्ट’ने ”या’ कारणासाठी मुख्यमंत्र्यांनी चहापानाला मारलेली दांडी’ या मथळ्याखाली पहिले वृत्त दिले होते, त्यानंतर ‘मुख्यमंत्र्यांसाठी एका रात्रीत ‘राजमार्ग’ तयार केला, पण…’ या मथळ्याखाली दुसरे वृत्त दिले होते.

(हेही वाचा मुख्यमंत्र्यांसाठी एका रात्रीत ‘राजमार्ग’ तयार केला, पण…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.