शिक्षक, पदवीधरच्या निवडणुकांसाठी उबाठा गटाने कंबर कसली असून उमेदवारांच्या नावांची चाचपणी सुरु झाली आहे. उबाठा गटाकडून मुंबई आणि कोकण पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवार लवकरच जाहीर होणार आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब, वरून सरदेसाई यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच, मुंबई शिक्षक मतदार संघात ज. मो. अभ्यंकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात किशोर जैन यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Vidhan Parishad Election)
तर दुसरीकडे काँग्रेसने देखील कोकण पदवीधर मतदारसंघासाठी कंबर कसली असून या ठिकाणी आपलाच उमेदवार उतरवण्याची जोरदार तयारी मागील सहा महिन्यांपासून सुरू असल्याचे कळते. काँग्रेसचे रत्नागिरी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते रमेश कीर हे देखील या ठिकाणी इच्छुक असून त्यांनी आपली तयारी सुरू देखील केली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघांमध्ये विलास पोतनीस हे आमदार म्हणून कार्यरत आहेत. मात्र आता त्यांच्याऐवजी विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांना मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाकडून उमेदवार म्हणून उतरवले जाऊ शकते. अनिल परब यांचा २७ जुलै रोजी विधान परिषदेच्या आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. (Vidhan Parishad Election)
(हेही वाचा – Dabholkar Murder Case प्रकरणातील निकालामुळे हिंदू दहशतवादचे नेरेटिव्ह सेट करण्याचे षडयंत्र उध्वस्त झाले; अभय वर्तकांचा घणाघात)
मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी अनिल परब यांचं नाव उमेदवारीसाठी अधिक चर्चेत आहे. त्यासोबतच उबाठा गटाचे युवा नेते सचिव वरुण सरदेसाई यांचासुद्धा विचार मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी केला जात आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांचे नाव जवळपास निश्चित मानला जात आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून रायगडचे सह संपर्कप्रमुख आणि अनंत गीते यांचे विश्वासू किशोर जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर नाशिक शिक्षक मतदारसंघात सध्या आमदार असलेले किशोर दराडे हे जरी शिवसेना उबाठा गटासोबत असले तरी शिवसेना उबाठा गटाकडून अन्य नावांचीही चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. (Vidhan Parishad Election)
दरम्यान, विधान परिषदेच्या चार जागांसाठीच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघाचा समावेश आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. या चारही जागांची मुदत ७ जुलै २०२४ ला संपत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २२ मे आहे तर, मतदानाची तारीख १० जून आहे. १३ जूनला मतमोजणी होईल. (Vidhan Parishad Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community