बांबूपासून डिझेल तयार होणार! काय म्हणाले वनमंत्री मुनगंटीवार?

122

गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात बांबूवर आधारित अनेक अभ्यासक्रम सुरू करणार आहेत. बांबूपासून उत्तम दर्जाचे टॉवल तयार होतात. बांबूपासून डिझेल तयार करण्याच्याही प्रस्तावावर विचार सुरू असून यासंदर्भात ऑस्ट्रेलियाच्या एका कंपनीशी बोलणे सुरू असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ते अॅग्रोव्हीजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात बांबू उत्पादनातून उत्पन्नाच्या संधी यावरील परिषदेत बोलत होते.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही बाब शक्य आहे. बांबू संदर्भातील नवनवीन संशोधन सुरू असून शास्त्रशुद्ध बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष सिद्ध होऊ शकते. जागतिक स्तरावर बांबूची मोठी बाजारपेठ असून चीन आणि आशिया खंडातील अन्य देशांमध्ये बांबूवर आधारित अर्थव्यवस्था सुधारत आहे. तर बांबू उत्पादन योग्य प्रकारे हाताळल्यास हे पीक कल्पवृक्ष सिद्ध होऊ शकते आणि हे प्रयोगातून सिद्ध झाले आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य या सर्व क्षेत्राला बळकटी देण्याचे काम बांबूच्या उत्पादनामुळे होऊ शकते, असे सुधीर मुनगंटीवारांनी सांगितले तर बांबूपासून धानापर्यंत पोहोचण्यासाठी लवकरच विनविभाग मनरेगा, जलसंधारण विभागाची बैठक घेतली जाईल असेही ते म्हणाले.

(हेही वाचा – राज्यपालांच्या मुद्द्यावरून भाजपाची कोंडी करण्याच्या प्रयत्नात उद्धवसेना पडली एकाकी)

या परिषदेत माजी आमदार पाशा पटेल, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, महाराष्ट्र बांबू मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास राव, सल्लागार डॉ. सी. डी. मायी, आयोजन सचिव रवींद्र बोरटकर उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.