मुनगंटीवार पुन्हा वनमंत्री होताच ‘त्या’ वनाधिकाऱ्यांची हजेरी

95
वनमंत्रीपदाची धुरा दुसऱ्यांदा सांभाळणारे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आता काही वनाधिकाऱ्यांची हजेरी घेण्यास सुरुवात केली आहे.  ज्या वनाधिकाऱ्यांचे वर्तन सामाजिक स्तरावर आक्षेपर्ह आहे. त्यांची दोन महिन्यांत बदलीही होण्याचे संकेत वनाधिकाऱ्यांच्याच चर्चेतून मिळत आहेत.
मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहात वनविभागाशी संबंधित विविध कार्यक्रम पार पडले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या कार्यक्रमाला स्वतःहून उपस्थित होते. राज्यातील कांदळवन कक्षासह विविध विषयांशी संबंधित बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. सत्ता बदलताच औपचारिकता म्हणून ओळखही न बाळगणाऱ्या काही वनाधिकाऱ्यांच्या वर्तणूकीची वाईट आठवण मनात घर करून राहते, हा अनुभव वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आला. महिन्याअखेरीस राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये निवृत्त होत आहेत. लिमये यांच्या संपूर्ण वनविभागाच्या कारकिर्दीत व्यावसायिक पातळीवर त्यांनी सरकारी अधिकारी या नात्याने सर्व घटकांना समान वागणूक दिली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही लिमये यांच्या निवृत्तीनंतर सक्षम वनाधिकाऱ्यांचीच त्या पदावर निवड केली जावी, अशी आग्रही भूमिका मांडली आहे. राज्यातील वाढता मानव-वन्यप्राणी संघर्ष, वनसंवर्धनाच्या उपाययोजना यासाठी आगामी प्रधान मुख्यवनसंरक्षक (वन्यजीव) पदावर जबाबदार वनाधिकाऱ्याला निवडले जावे, असा वनमंत्र्यांचा आग्रह आहे. या पदासाठी सध्याचे कांदळवन कक्षाचे अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक वीरेंद्र तिवारी आणि अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पूर्वचे बीएस हुडा यांचे नाव चर्चेत आहे. त्यापैकी बीएस हुडा यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.