Fake Signature And Letterhead OF DCM : उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट लेटरहेड अन् ई-मेल; कशासाठी झाला वापर ?

Fake Signature And Letterhead OF DCM : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे खाजगी सचिवांचे बनावट ई-मेल खाते तयार करून सदर ईमेलद्वारे, विद्युत विभागाशी संबंधित 6 अभियंत्यांच्या बनावट बदलीचे आदेश विद्युत विभागाला ईमेल करण्यात आले आहेत.

319
Fake Signature And Letterhead OF DCM : उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट लेटरहेड अन् ई-मेल; कशासाठी झाला वापर ?
Fake Signature And Letterhead OF DCM : उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट लेटरहेड अन् ई-मेल; कशासाठी झाला वापर ?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे बनावट लेटरहेड, सही आणि ई-मेल बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Fake Signature And Letterhead OF DCM) अधिकाऱ्यांच्या बदली आदेशासाठी उपमुख्यमंत्र्यांचे बनावट लेटरहेड आणि बनावट सहीचा वापर करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांचे बनावट ई-मेल, लेटरहेड आणि सही वापरले गेल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे.

(हेही वाचा – Congress चे मुंबईतील ४० टक्के माजी नगरसेवक इतर पक्षात)

गृह विभागाने पाठवले परिपत्रक

हे प्रकरण समोर आल्यानंतर गृह विभागाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे खाजगी सचिवांचे बनावट ई-मेल खाते तयार करून सदर ईमेलद्वारे, विद्युत विभागाशी संबंधित 6 अभियंत्यांच्या बनावट बदलीचे आदेश विद्युत विभागाला ईमेल करण्यात आले आहेत. बदली आदेशांवर उपमुख्यमंत्र्यांच्या बनावट लेटरहेडवर बनावट स्वाक्षऱ्या असल्याचे निदर्शनास आले आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन भविष्यात अशा बाबींची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी मार्गदर्शक सूचनांचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे.

अधिकृत ई-मेल वापरणे बंधनकारक

या पत्रकानुसार आता सरकारने सर्व विभागांना अधिकृत ई-मेल वापरणे बंधनकारक केले आहे. शासकीय विभागांना आता जी-मेल आणि इतर खाजगी मेलचा वापर करता येणार नाही. शासकीय विभागांनी आणि त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांनी एकमेकांशी पत्रव्यवहार करण्यासाठी आणि इतर व्यवहारांसाठी नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) द्वारे अधिकृत केलेल्या gov.in/nic.in या डोमेन नेमचा (Domain name) वापर केलेल्या ई-मेलचा शासकीय कामकाजासाठी वापर करणे बंधनकारक करण्यात येत आहे. (Fake Signature And Letterhead OF DCM)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.