मंत्रिपदाची अपेक्षा न ठेवता आता लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागा, असे आदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील नेत्यांना दिले आहेत. (BJP) आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली असून त्याची जोरदार तयारी देखील सुरू केली आहे. लोकसभेच्या सर्व जागा निवडून आणायच्या आहेत. लोकसभेच्या ४८ जागापैकी ४५ पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. असे भाजपच्या नेत्यांना सांगण्यात आले आहेत. तसा आदेशच देण्यात आले आहेत.
(हेही वाचा – Railway : रेल्वेने अपघात नुकसानभरपाई दहापट वाढवली)
लोकसभेसोबत विधानसभा निहाय दौरे करणार…
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा पैकी ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे भाजपने लक्ष्य ठेवलेल आहे. (BJP) या मिशनसाठी काही केंद्रीय मंत्र्यांनी राज्याचे दौरे सुरू केले आहेत. आता भाजपचे प्रमुख नेते विधानसभेच्याही १४४ मतदारसंघात दौरे करणार असून निवडणुकीची रणनीती आखणार आहेत. भाजपच्या मिशन ४५ साठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, लोकसभेच्या मिशन ४५ साठीचे भाजपने १२ शिलेदार निवडले आहेत. भाजपने १२ प्रमुख नेत्यांची या मिशनसाठी निवड केली असून प्रत्येक नेत्याकडे २ लोकसभा मतदारसंघ सोपवले आहेत. यामध्ये आशिष शेलार, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे अशा प्रमुख नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ४८ जागापैंकी २३ जागा जिंकल्या होत्या, तर १८ जागा शिवसेनेला मिळाल्या. ४ जागांवर राष्ट्रवादी काॅंग्रेस, तर काॅंग्रेस आणि एमआयएमचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला होता. (BJP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community