राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना माहिम येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटत होते. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. डॉ. चारुलता संकला यांच्या निगराणीखाली मनोहर जोशींना ठेवण्यात आले आहे.
(हेही वाचा – जयंत पाटलांना फोन न करण्याचे अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण; म्हणाले, फोन करण्यापेक्षा….)
दरम्यान मनोहर जोशींच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काही वेळापूर्वी हिंदुजा रुग्णालयात पोहोचले होते. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत पत्नी रश्मी ठाकरे देखील होत्या.
मनोहर जोशी हे ८६ वर्षांचे आहेत. शिवसेनेतील जुन्या बुजुर्ग नेत्यांपैकी मनोहर जोशी एक आहेत. विधानपरिषद शिवसेनेकडून लढून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९७६ ते १९७७ या काळात त्यांनी मुंबईचे महापौर पद भूषविले होते. तसेच त्यांनी भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाची धुरा देखील सांभाळली होती. पण मागील काही काळापासून ते राजकारणात फार सक्रीय नव्हते. सोमवारी, २२ मे रोजी मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यामध्ये अडथळा निर्माण झाल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. चारुलता संकला यांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community